दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
दूरसंचार विभागाने प्रसिद्ध केलेली राष्ट्रीय फ्रिक्वेन्सी वाटप योजना 2025; 30 डिसेंबर 2025 पासून लागू होईल, ज्यामुळे भारत जागतिक स्पेक्ट्रम मानकांनुसार संरेखित होईल
5G, 5G ऍडव्हान्स्ड, भविष्यातील 6G, सॅटेलाइट ब्रॉडबँड आणि V2X तंत्रज्ञानांना पाठबळ देण्यासाठी वाटपाचा विस्तार
प्रविष्टि तिथि:
30 DEC 2025 7:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 डिसेंबर 2025
दळणवळण मंत्रालयाच्या दूरसंचार विभागाने, नॅशनल फ्रिक्वेन्सी वाटप योजना 2025 सुरू केली आहे. भारतातील रेडिओ-फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रमच्या व्यवस्थापनावर आणि वाटपावर नियंत्रण ठेवणारा हा एक महत्त्वाचा धोरणात्मक दस्तऐवज आहे. नॅशनल फ्रिक्वेन्सी वाटप योजना 2025 ही योजना 30 डिसेंबर 2025 पासून लागू होईल.
नॅशनल फ्रिक्वेन्सी वाटप योजना 2025अंतर्गत 8.3 किलोहर्टझ् ते 3000 गिगा हर्टझ् दरम्यानच्या फ्रिक्वेन्सी अंतर्गत विविध रेडियो कम्युनिकेशन सेवांना रेडियो फ्रिक्वेन्सी पुरवण्यात येईल. स्पेक्ट्रम व्यवस्थापक, वायरलेस ऑपरेटर्स आणि दूरसंचार सामग्री उत्पादक यांच्यासाठी महत्त्वाचा संदर्भ असेल.
नॅशनल फ्रिक्वेन्सी वाटप योजना 2025 मध्ये महत्त्वाच्या सुधारणा:
नॅशनल फ्रिक्वेन्सी वाटप योजना 2025 ने पुढील पिढीच्या तंत्रज्ञानासाठी वाढत्या स्पेक्ट्रमची मागणी पूर्ण करण्यासाठी अनेक धोरणात्मक आणि भविष्यवेधी सुधारणा सादर केल्या आहेत. ..आंतरराष्ट्रीय मोबाईल दूरसंचार साठी 6425–7125 मेगाहर्ट्झ बँडची निवड, ज्यामुळे 5जी, 5जी ऍडव्हान्स्ड आणि भविष्यातील 6जी नेटवर्कसाठी मिड-बँड स्पेक्ट्रमची उपलब्धता लक्षणीयरीत्या वाढेल.
- उपग्रह-आधारित सेवांसाठी Ka, Q, आणि V बँड्सचे वाटप, जे उच्च-थ्रुपुट भूस्थिर कक्षेतील उपग्रहांसाठी आणि मोठ्या बिगर-भूस्थिर कक्षा उपग्रह समूहांसाठी महत्त्वपूर्ण आहे.
- हवेत आणि समुद्रात अखंड ब्रॉडबँड पोहोच सुनिश्चित करण्यासाठी इन-फ्लाइट आणि सागरी कनेक्टिव्हिटी साठी अतिरिक्त स्पेक्ट्रम.
- व्हेईकल-टू-एव्हरीथिंग (V2X) कम्युनिकेशन, LEO/MEO उपग्रह सेवा आणि विस्तारित ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी सोल्यूशन्ससारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानासाठी पाठबळ.
या वाढींमुळे भारताचे स्पेक्ट्रम व्यवस्थापन प्रतिसादक्षम, उच्च-क्षमतेचे आणि जागतिक मानकांशी सुसंगत राहील, जे सध्याच्या आणि भविष्यातील दोन्ही डिजिटल नवकल्पनांना समर्थन देईल, ज्यामुळे भारतातील परिसंस्थेच्या विकासाला चालना मिळेल.
Follow DoT Handles for more: -
X - https://x.com/DoT_India
Insta- https://www.instagram.com/department_of_telecom?igsh=MXUxbHFjd3llZTU0YQ==
Fb - https://www.facebook.com/DoTIndia
Youtube: https://youtube.com/@departmentoftelecom?si=DALnhYkt89U5jAaa
* * *
निलिमा चितळे/शैलेश पाटील/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2209910)
आगंतुक पटल : 8