गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी ग्लोबल हिंदू वैष्णव प्रेरणा महोत्सवात दूरदृश्य प्रणालीद्वारे केलेले संबोधन
21 ते 29 डिसेंबर 2025 दरम्यान, वडोदरा शहर जागतिक वैष्णव राजधानी म्हणून उदयास येईल
या काळात जगभरातील 25 देशांतील वैष्णव एका मंचावर एकत्र आले, भक्तिभावनेने एकवटलेले
आरोग्य, अन्न, गौरक्षण, शिक्षण आणि राष्ट्र या क्षेत्रांत पूज्यश्रींनी सुरू केलेले पाच उपक्रम संपूर्ण जगासाठी आदर्श ठरतील
धर्म, करुणा आणि समाजसेवेचा संगम पूज्यश्रींच्या या उपक्रमात दिसतो हे विलक्षण आहे
प्रविष्टि तिथि:
26 DEC 2025 7:59PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 डिसेंबर 2025
गृह आणि सहकार मंत्री श्री अमित शाह यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे "ग्लोबल हिंदू वैष्णव प्रेरणा महोत्सव"ला संबोधित केले. आपल्या भाषणात शाह म्हणाले की, जेव्हा देश कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेतून जात होता, तेव्हा पूज्यश्रींनी उभारलेल्या ऑक्सिजन प्लांट्समुळे केवळ हजारो- लाखो लोकांचे प्राण वाचविण्यात मदत झाली नाही, तर आजही अनेक रुग्णालयांमध्ये त्यांचा वापर केला जात आहे. त्यांनी पुढे सांगितले की, पुष्टिमार्गीय पंथ आपल्या प्रत्येक अनुयायाला भक्ती आणि प्रेमाने परिपूर्ण जीवन जगण्याची प्रेरणा देतो आणि त्याचबरोबर पुष्टिमार्गीयांच्या मनामध्ये शांतता, संतुलन आणि अस्तित्व या पवित्र मूल्यांचे संस्कार रुजवतो ही सर्व गुणधर्मांची संगम स्थिती आहे.
शाह म्हणाले की, 21 ते 29 डिसेंबर 2025 या कालावधीत वडोदरा शहर जगातील वैष्णव राजधानी म्हणून उदयास येईल. त्यांनी सांगितले की, या काळात जगातील 25 देशांतील वैष्णव एकाच मंचावर, एकाच भावनेने आणि एकाच भक्तीभावाने एकत्र येतील आणि दिव्य कथामृताचा रसास्वाद घेतील, ज्यामुळे येणाऱ्या काळात सेवाक्षेत्रांच्या सर्व अंगांना नक्कीच लाभ होईल.
पूज्यश्री व्रजराजकुमारजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली या महोत्सवाच्या काळात पाच महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात येत आहेत, असे शाह यांनी सांगितले. या पाच प्रकल्पांद्वारे म्हणजेच तणावमुक्त विश्व, भुकेल्यांना अन्न, प्रत्येक घरात गोसेवा, हिंदू शाळा प्रकल्प, आणि राष्ट्रीय सेवा प्रकल्प देशवासीयांमध्ये धर्माविषयीची भक्ती बळकट होईल आणि "नर ही नारायण आहे”या तत्त्वात अंतर्भूत असलेल्या सेवाभावाची पुनर्स्थापना करण्यासाठी हे प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरतील.
आपल्या 15 वर्षांच्या प्रवासात पूज्यश्रींनी 15 हून अधिक देशांमध्ये आणि 46 पेक्षा अधिक शहरांमध्ये लाखो समर्पित स्वयंसेवकांना प्रेरित आणि सक्रिय केले आहे, असे शाह यांनी सांगितले. केवळ 39 वर्षांच्या तरुण वयात पूज्यश्रींनी 25 देशांमध्ये पुष्टिमार्गाचा ध्वज फडकावला असून, आपल्या दिव्य हातांनी पाच लाखांहून अधिक आत्म्यांना ब्रह्मसम्बंधात दीक्षित करून परमात्म्याशी जोडण्याचे पवित्र कार्य पार पाडले आहे. धर्म, करुणा, सेवा आणि समाज यांना एकत्र आणण्यासाठी पूज्यश्री करत असलेले अखंड प्रयत्न हे निःसंशयपणे थोर आणि गौरवपूर्ण कार्य आहे, असे शाह यांनी सांगितले.
शाह यांनी पुढे सांगितले की, वैष्णव जन तो तेने कहिये जो पीर परायी जाणे रे" या म्हणीचे खरे रूप दाखवत पूज्यश्रींनी सुरू केलेले हे पाच प्रकल्प पुढील काळात भारतातील तसेच जगभरातील पुष्टिमार्गीयांसाठी आदर्श ठरतील. त्यांनी सांगितले की, हिंदू संस्कृतीत कथा म्हणजे मनाचे शुद्धीकरण, विवेकाचा जागर, जीवनाच्या दिशेतील परिवर्तन आणि स्वकेंद्रित जीवनातून समाजकेंद्रित जीवनाकडे जाण्याची प्रक्रिया आहे. पूज्यश्री व्रजराजकुमारजी महाराजांनी ही परंपरा जगातील अनेक ठिकाणी पुनरुज्जीवित केली आहे, असे शाह यांनी सांगितले. आठ देशांमध्ये 250 हून अधिक कथांद्वारे त्यांनी लाखो अनुयायांना जोडले आहे आणि पाच लाखांहून अधिक लोकांना ब्रह्मसम्बंधात दीक्षित करून त्यांना ब्रह्माशी जोडण्याचे माध्यम बनले आहेत.
* * *
नितीन फुल्लुके/राज दळेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2209051)
आगंतुक पटल : 13