राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय संरक्षण लेखा सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

प्रविष्टि तिथि: 24 DEC 2025 7:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 डिसेंबर 2025

 

भारतीय संरक्षण लेखा सेवेतील  (2025 तुकडी) प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी आज (24 डिसेंबर, 2025) राष्ट्रपती भवनात  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. यावेळी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन  करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, भारतीय संरक्षण लेखा सेवेचे अधिकारी भारतीय सशस्त्र दल आणि संबंधित संस्थांच्या आर्थिक संसाधनांच्या व्यवस्थापनात एक महत्त्वाचे स्थान भूषवतात. अर्थसंकल्प आणि लेखांकनापासून ते लेखापरीक्षण, देयके, आर्थिक सल्ला आणि संरक्षण खर्चात पारदर्शकता सुनिश्चित करण्यापर्यंत, त्यांची भूमिका कार्यात्मक सज्जता आणि संरक्षण पायाभूत सुविधांच्या विकासावर थेट परिणाम करते. या अधिकाऱ्यांना राष्‍ट्रपती मुर्मू यांनी सल्ला दिला की, संरक्षण सेवांचे प्रमुख लेखा आणि वित्तीय प्राधिकरणामध्‍ये कार्य करताना, आपल्या सशस्त्र दलांना सामोरे जाणाऱ्या अद्वितीय आव्हाने, अडचणी आणि कार्यात्मक वास्तविकता समजून घेणे त्यांच्याकडून अपेक्षित आहे.

राष्ट्रपती म्हणाल्या की, अतिशय वेगाने होत असलेल्या काळामध्‍ये  आपण जगत आहोत. विकसित होत असलेले भू-राजकीय वातावरण आणि उदयास येणारी सुरक्षा आव्हाने जलद, अधिक हुशार आणि अधिक अचूक निर्णय घेण्याची मागणी करतात. त्याचवेळी, व्यावसायिक प्रक्रिया अधिक गुंतागुंतीच्या आणि तंत्रज्ञान-आधारित होत आहेत. या संदर्भात, संरक्षण लेखा विभागाने सातत्याने बदलत्या तंत्रज्ञानाशी  जुळवून घेतले पाहिजे, नवनवीन प्रयोग केले पाहिजेत आणि आधुनिकीकरण केले पाहिजे. स्वदेशी उत्पादनाला प्रोत्साहन देऊन, स्थानिक पुरवठा साखळी मजबूत करून आणि देशांतर्गत उद्योगाला चालना देऊन सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'आत्मनिर्भर भारत अभियाना'ला सक्रियपणे पाठिंबा देण्याची तातडीची गरज आहे. भारतीय संरक्षण लेखा सेवेचे अधिकारी देखील आत्मनिर्भर आणि लवचिक संरक्षण परिसंस्था निर्माण करण्यासाठी योगदान देऊ शकतात.

Please click here to see the President's speech

* * *

शैलेश पाटील/सुवर्णा बेडेकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2208257) आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Tamil , Malayalam