कृषी मंत्रालय
चौधरी चरण सिंह किसान सन्मान सोहळ्यात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचा प्रमुख पाहुणे म्हणून सहभाग
प्रविष्टि तिथि:
20 DEC 2025 8:40PM by PIB Mumbai

किसान ट्रस्टच्या वतीने आज नवी दिल्लीतील पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री इथे चौधरी चरण सिंह किसान सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण, तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान प्रमुख पाहुणे म्हणून म्हणून सहभागी झाले. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते एका पुस्तकाचे प्रकाशन झाले, तसंच कृषी क्षेत्रातील अनुकरणीय योगदानाबद्दल प्रगतशील शेतकरी आणि संस्थांचा त्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी उपस्थितांना संबोधितही केले.

चौधरी चरण सिंह हे आयुष्यभर एक आदर्श व्यक्तिमत्व राहिल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. संपूर्ण राष्ट्र त्यांच्याकडे आशा आणि विश्वासाने पाहत होते. ते सत्य, नम्रता आणि दृढनिश्चयाचे प्रतीक होते, गावे, गरीब तसेच शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी ते पूर्णपणे समर्पित होते अशा शब्दांत त्यांनी चौधरी चरण सिंह यांच्या कार्याचा गौरव केला. भारताच्या समृद्धीचा मार्ग शेतकऱ्याच्या शेताच्या बांधावरून जातो, हे वास्तव चौधरी साहेबांनीच मांडले होते, असे चौहान यांनी नमूद केले.
अलीकडेच मंजूर झालेल्या ‘विकसित भारत – गॅरंटी फॉर एम्प्लॉयमेंट अँड लाइव्हलीहूड मिशन (रुरल), अर्थात जी राम जी कायद्याबद्दलही त्यांनी आपले विचार मांडले. गरिबांचे कल्याण ही भावना हाच या कायद्याचा गाभा असल्याचे ते म्हणाले. या कायद्यांतर्गत रोजगाराची हमी 100 दिवसांवरून वाढवून 125 दिवस करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
या नवीन कायद्याअंतर्गत पंचायतींचे विकास आणि रोजगाराच्या गरजांनुसार वर्गीकरण केले आहे, आणि त्यानुसारच निधीचे वाटप केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या कायद्यात पेरणी, कापणी या आणि शेतीच्या कामांशी जोडलेल्या मजुरांचाही विचार केला गेला असल्याचे ते म्हणाले. शेतकरी आणि मजूर यांच्यात सुदृढ समतोल निर्माण करण्याचा प्रबळ प्रयत्न या कायद्याच्या माध्यमातून करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी चौहान यांनी किसान ट्रस्टला आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी आणि कृषी क्षेत्रासाठी पंचवार्षिक योजना तयार करण्यासाठी सूचना, तसेच त चिंतन शिबिरासाठी विचार आणि कल्पना मांडाव्यात असे आवाहनही केले.
***
सुषमा काणे/तुषार पवार/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2207114)
आगंतुक पटल : 5