पंतप्रधान कार्यालय
संसदेत ‘शांती’ विधेयक पारित झाल्याबद्दल पंतप्रधानांनी केला आनंद व्यक्त
प्रविष्टि तिथि:
18 DEC 2025 9:47PM by PIB Mumbai
संसदेच्या दोन्ही सभागृहांत ‘शांती’ विधेयक पारित झाल्याबद्दल पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला असून, हे भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रासाठी महत्त्वाचे परिवर्तन घडवणारे पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
विधेयकाला पाठिंबा दिल्याबद्दल संसद सदस्यांचे आभार व्यक्त करताना पंतप्रधानांनी सांगितले की, हे विधेयक कृत्रिम बुद्धिमत्तेला सुरक्षितपणे सक्षम करेल, हरित उत्पादनाला चालना देईल आणि देशासह जगासाठी स्वच्छ ऊर्जेच्या भविष्यास ठोस गती प्रदान करेल.
शांती विधेयक खासगी क्षेत्र आणि युवकांसाठी विविध संधी निर्माण करेल, असे मोदी यांनी सांगितले. भारतात गुंतवणूक, नवकल्पना आणि विकास करण्यासाठी सध्याचा काळ अत्यंत अनुकूल असल्याचेही त्यांनी नमूद केले.
‘एक्स’ वरील संदेशात पंतप्रधान म्हणाले की,
“संसदेच्या दोन्ही सभागृहांत शांती विधेयक मंजूर होणे हे आपल्या तंत्रज्ञान क्षेत्रासाठी एक परिवर्तनकारी पाऊल आहे. या विधेयकाच्या मंजुरीस पाठिंबा दिल्याबद्दल सर्व संसद सदस्यांचे मी आभार मानतो. कृत्रिम बुद्धिमत्तेला सुरक्षितपणे सक्षम करण्यापासून ते हरित उत्पादनाला चालना देण्यापर्यंत, हे विधेयक देशासह जगासाठी स्वच्छ ऊर्जेच्या भविष्यास ठोस गती देईल. यामुळे खासगी क्षेत्रातआपल्या युवकांसाठीही अनेक संधी खुल्या होतील. भारतात गुंतवणूक करण्यासाठी, नवोन्मेष घडवण्यासाठी आणि उभारणी करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे!”
***
NitinFulluke/RajDalekar/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2206402)
आगंतुक पटल : 18
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam