पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये तिरंदाजीच्या मिश्र सांघिक कंपाऊंड स्पर्धेत ज्योती सुरेखा वेन्नम आणि ओजस यांनी सुवर्णपदक जिंकल्याबद्दल त्यांचे केले अभिनंदन

प्रविष्टि तिथि: 04 OCT 2023 12:52PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हांगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये तिरंदाजीच्या मिश्र सांघिक कंपाऊंड स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल ज्योती सुरेखा वेन्नम आणि ओजस यांचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी 'एक्स' या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे :

“आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीतील पहिले सुवर्णपदक!

मिश्र सांघिक कंपाऊंड स्पर्धेत अचूक लक्ष्य साधून शानदार विजय मिळवल्याबद्दल ज्योती सुरेखा वेन्नम आणि ओजस यांचे अभिनंदन. त्यांचे अनन्यसाधारण कौशल्य, अचूकता आणि सांघिक भावनेमुळे हे सर्वोत्कृष्ट यश मिळाले. त्यांचे अभिनंदन.”

***

AshishSangle/ShraddhaMukhedkar/DineshYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2204471) आगंतुक पटल : 27
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Punjabi , English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Manipuri , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam