अल्पसंख्यांक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

2026 च्या हज यात्रेसाठी एचजीओ/पीटीओ मार्फत बुकिंग करण्यासंदर्भात यात्रेकरूंसाठी मार्गदर्शक सूचना

प्रविष्टि तिथि: 15 DEC 2025 3:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 डिसेंबर 2025

सर्व इच्छुक यात्रेकरूंना सूचित करण्यात येते की, सौदी अरेबियाच्या हज आणि उमराह मंत्रालयाने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार, हज-2026 साठी निवास आणि सेवा करार अंतिम करण्याची शेवटची तारीख 1 फेब्रुवारी 2026 आहे.सौदी अरेबियामध्ये यात्रेकरूंसाठी निवास, वाहतूक आणि इतर लॉजिस्टिक सेवा सुनिश्चित करण्यासाठी ही अनिवार्य करार व्यवस्था आवश्यक आहे.

वर नमूद केलेल्या वेळापत्रकाच्या अनुषंगाने आणि हज गट आयोजक (एच जी ओ) आणि खाजगी टूर ऑपरेटर (पीटीओ) यांनी पूर्ण करावयाच्या विविध तयारीच्या आवश्यकतांचा विचार करता, यांच्याद्वारे हज करण्याची इच्छा असलेल्या सर्व संभाव्य यात्रेकरूंना त्यांचे बुकिंग लवकरात लवकर  करून घेण्याचा सल्ला दिला जात आहे. हज-2026 साठी सौदी अरेबियाच्या राज्याने निश्चित केलेल्या मुदतीमध्ये निवास आणि वाहतूक करारांना अंतिम रूप देण्यासह प्रक्रियात्मक पूर्तता पूर्ण करण्यासाठी वेळेवर बुकिंग करणे आवश्यक आहे.

त्यानुसार, सर्व यात्रेकरूंना सल्ला देण्यात येतो की, आवश्यक निवास आणि सेवा करारांना निर्धारित मुदतीत अंतिम रूप देण्यासाठी, शेवटच्या क्षणी होणारी  गैरसोय टाळण्यासाठी आणि सर्व अनिवार्य प्रक्रिया वेळेवर पूर्ण करण्यासाठी, त्यांनी आपली बुकिंगची औपचारिकता 15.01.2026 रोजी किंवा त्यापूर्वी पूर्ण करावी.

यात्रेकरूंना असाही सल्ला देण्यात येतो की, बुकिंग करण्यापूर्वी संबंधित एचजीओ/पीटीओची नोंदणी स्थिती, कोटा आणि मंजुरीची पडताळणी करावी आणि केवळ अधिकृत एचजीओमार्फतच बुकिंग करावे.

सुषमा काणे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2204056) आगंतुक पटल : 13
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Malayalam , Bengali , Bengali-TR , English , Urdu , हिन्दी , Punjabi , Tamil