माहिती आणि प्रसारण मंत्रालय
भारतीय चित्रपट उद्योगातील कृत्रिम बुद्धीमत्ता साधनांवर देखरेख; मात्र नियामक प्रणालीबाबतचा प्रस्ताव नाही - डॉ. एल. मुरुगन यांची राज्यसभेत माहिती
प्रविष्टि तिथि:
12 DEC 2025 5:19PM by PIB Mumbai
भारतीय चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रात कथा लेखन, संवाद निर्मिती, कथेची रुपरेषा आणि पटकथा यासाठी कृत्रिम बुद्धीमत्ता साधनांचा वापर वाढत असल्याची सरकारला जाणीव आहे.
कथा लेखन आणि चित्रपट निर्मिती या क्षेत्रातील कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वापरावर नियमनासाठी 1952 च्या सिनेमाटोग्राफ कायद्यात सुधारणा करण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या विचाराधीन नाही.
माहिती आणि प्रसारण तसेच संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी एस. निरंजन रेड्डी यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल राज्यसभेत ही माहिती दिली.
***
निलिमा चितळे/सुरेखा जोशी/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2203340)
आगंतुक पटल : 6