पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उल्फा सोबतच्या शांती करारावर झालेल्या स्वाक्षरीचे केले स्वागत
Posted On:
29 DEC 2023 10:15PM by PIB Mumbai
उल्फा सोबतच्या शांती करारावर स्वाक्षरी झाल्याने आसामच्या शाश्वत प्रगतीचा मार्ग मोकळा झाला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हटले आहे.
भारत सरकार आणि आसाम सरकारने राज्यातील सर्वात जुना बंडखोर गट उल्फा (ULFA) सोबत शांती करार केला आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे दिली आहे. बंडखोर गटाने हिंसाचाराचा मार्ग सोडून देण्यास, सर्व शस्त्रे आणि दारूगोळा समर्पण करण्यास, कायद्याने स्थापित केलेल्या शांततापूर्ण लोकशाही प्रक्रियेत सामील होण्यास आणि देशाची अखंडता राखण्यास सहमती दर्शविली आहे, असेही शहा यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर शहा यांच्या संदेशाला प्रतिसाद देताना म्हटले आहे :
"आज शांतता आणि विकासाच्या दिशेने आसामच्या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा सुरु झाला आहे. या करारामुळे आसामच्या शाश्वत प्रगतीचा मार्ग मोकळा झाला. या ऐतिहासिक कामगिरीत सहभागी असलेल्या सर्वांच्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो. एकत्रितपणे, आपण सर्व मिळून एकता, प्रगती आणि सर्वांच्या समृद्धीने परिपूर्ण भविष्य घडविण्याकडे वाटचाल करत आहोत.”
***
आशिष सांगळे / श्रद्धा मुखेडकर / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2203008)
अभ्यागत कक्ष : 18
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam