गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी दिल्लीत आयोजित स्मृती सभेत प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली
भाषिक आणि प्रादेशिक सीमा ओलांडून आपल्या अभिनयाने धर्मेंद्रजींनी लाखो भारतीयांची मने जिंकली; सर्व स्तरातील लोकांच्या मनावर कायमचा ठसा उमटवला
भारतीय चित्रपटसृष्टीला या असाधारण अभिनेत्याची उणीव कायम भासेल
Posted On:
11 DEC 2025 9:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2025
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी दिल्लीत आयोजित एका स्मृती सभेत प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी धर्मेंद्र यांच्या योगदानाचे स्मरण केले आणि त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले.
‘X’ वरील एका पोस्टमध्ये, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, धर्मेंद्र यांनी भाषिक आणि प्रादेशिक सीमांच्या पलीकडे जाऊन आपल्या अभिनयाद्वारे लाखो भारतीयांची मने जिंकली आणि सर्व स्तरातील लोकांच्या मनावर आपला कायमचा ठसा उमटवला. भारतीय चित्रपटसृष्टीला या असाधारण अभिनेत्याची उणीव कायम भासणार आहे, असेही ते म्हणाले.
शैलेश पाटील/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2202637)
अभ्यागत कक्ष : 35