पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

स्वाहिद दिनानिमित्त पंतप्रधानांनी शहीदांना आदरांजली वाहिली

Posted On: 10 DEC 2025 8:51AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या  स्वाहिद   दिनानिमित्त ऐतिहासिक आसाम चळवळीमध्ये सहभागी झालेल्या सर्वांच्या शौर्यपूर्ण योगदानाचे स्मरण केले.   

मोदी यांनी नमूद केले की आसाम आंदोलन आजही पिढ्यान्‌पिढ्यांना प्रेरणा देत आहे आणि राज्याच्या सांस्कृतिक बळकटीकरणासह सर्वांगीण विकासाच्या दृष्टीकोनाच्या पूर्ततेसाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.    

एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात:

 आज स्वाहिद दिनी आपण आसाम आंदोलनात सहभागी झालेल्या सर्वांच्या शौर्याचे स्मरण करतो. ही चळवळ आपल्या इतिहासात नेहमीच प्रमुख स्थानी राहील. आसाम चळवळीत ज्यांनी भाग घेतला त्या सर्वांची स्वप्ने, विशेषतः आसामच्या संस्कृतीचे बळकटीकरण तसेच राज्याची सर्वांगीण प्रगती प्रत्यक्षात साकार करण्याप्रती आमच्या कटिबद्धतेचा आम्ही पुनरुच्चार करत आहोत.”

***

NehaKulkarni/SanjanaChitnis/DineshYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2201318) अभ्यागत कक्ष : 58