जलशक्ती मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण)

प्रविष्टि तिथि: 08 DEC 2025 6:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2025

स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) अंतर्गत 04.12.2025 पर्यंत, राज्यांनी/केंद्रशासित प्रदेशांनी स्वच्छ भारत अभियानाच्या (ग्रामीण) ऑनलाइन एकात्मिक व्यवस्थापन माहिती प्रणालीवर नोंदवलेल्या माहितीनुसार, एकूण 5,67,873 गावे हागणदारीमुक्त प्लस म्हणून घोषित केली गेली आहेत (आकांक्षीत -75,892, उदयोन्मुख-3,958, आदर्श-4,88,023). स्वच्छ भारत अभियानाच्या (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत देशातील सर्व गावे हागणदारीमुक्त प्लस म्हणून घोषित करण्यासाठी वापरात असलेले प्रमुख निकष आणि प्रक्रिया खाली नमूद केल्याप्रमाणे आहेत: 

जे गाव आपला हागणदारीमुक्तीचा दर्जा कायम राखते, घन आणि द्रव कचरा व्यवस्थापन सुनिश्चित करते आणि दृश्यमयतेत ते दिसायलाही  स्वच्छ असते अशा गावाला हागणदारीमुक्त प्लस गाव म्हटले जाते.

हागणदारीमुक्त प्लस गावांच्या प्रगतीचे 3 टप्पे आहेत:

हागणदारीमुक्त प्लस आकांक्षी : असे गाव आहे, जे आपला हागणदारीमुक्तीचा दर्जा कायम राखून आहे, आणि जिथे घन कचरा व्यवस्थापन अथवा द्रवरुप कचरा व्यवस्थापनाची सोय आहे.

हागणदारीमुक्त प्लस उदयोन्मुख : असे गाव आहे, जे आपला हागणदारीमुक्तीचा दर्जा कायम राखून आहे, आणि जिथे घन कचरा व्यवस्थापन आणि द्रवरुप कचरा व्यवस्थापन अशा दोघांचीही सोय आहे.

हागणदारीमुक्त प्लस आदर्श : असे गाव आहे, जे आपला हागणदारीमुक्तीचा दर्जा कायम राखून आहे आणि जिथे घन कचरा व्यवस्थापन आणि द्रवरुप कचरा व्यवस्थापन अशा दोघांचीही सोय आहे,दृश्यमयतेत ते दिसायलाही  स्वच्छ आहे (उदा. कमीत कमी कचरा, कमीत कमी साचलेले दूषित पाणी, सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक कचरा टाकलेला नसणे), तसेच गावा हागणदारीमुक्त प्लस माहिती, शिक्षण आणि संवाद संदेश प्रदर्शित केले गेले आहेत.

स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) अंतर्गत, विभागामार्फत दारिद्र्यरेषेखालील सर्व कुटुंबांना आणि अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती कुटुंबांसह, दारिद्र्यरेषेवरील निश्चिती केल्या गेलेल्या कुटुंबांना वैयक्तिक घरगुती शौचालय बांधण्यासाठी 12000 रुपये इतके प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा-2 च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, दारिद्र्यरेषेवरील कुटुंबांपैकी अनुसूचित जाती/जमाती अंतर्गतच्या कुटुंबांना स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) अंतर्गत वैयक्तिक घरगुती शौचालय बांधणीकरता  प्रोत्साहन देण्यासाठी पहिले प्राधान्य दिले जाते.

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी, 2025-26 या वर्षाकरता स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) अंतर्गत राज्यानुसार/केंद्रशासित प्रदेशानुसार केलेली तरतूद आणि खर्चाची माहिती सोबत जोडलेल्या परिशिष्टात दिली आहे.  या अभियानाअंतर्ग महाराष्ट्रात अनुसूचित जातींकरता 10352.24 लाख रुपयांचा निधी दिला गेला असून, त्यापैकी 2915.64 लाख रुपये खर्च केले गेले आहेत, तर अनुसूचित जमातींकरता 7679.78 लाख रुपयांचा निधी दिला गेला असून, त्यापैकी 3013.24 लाख रुपये खर्च केले गेले आहेत.


केंद्रीय जल शक्ती राज्यमंत्री व्ही.सोमन्ना यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी  उत्तरात ही माहिती दिली.

Annexure

State/UT wise Allocation and Expenditure FY 2025-26 for SCs and STs

Rs. In Lakhs

Sr. No.

State/UT

SCs

STs

Allocation

Expenditure

Allocation Centre

Expenditure

1

Andhra Pradesh

5042.10

1085.26

1025.69

207.97

2

Arunachal Pradesh

0.00

0.00

701.22

0.00

3

Assam

2393.47

516.76

3031.30

612.51

4

Bihar

16029.27

1688.11

838.02

62.74

5

Chhattisgarh

1837.29

226.66

3283.33

469.50

6

Goa

5.55

2.68

32.15

0.00

7

Gujarat

2153.07

744.39

4671.41

1754.05

8

Haryana

2936.00

143.22

0.00

0.00

9

Himachal Pradesh

1628.50

717.76

236.85

76.46

10

Jammu & Kashmir

1938.26

484.57

3900.00

975.00

11

Jharkhand

2466.24

0.00

3809.93

217.14

12

Karnataka

3914.67

583.56

1116.28

222.43

13

Kerala

407.13

160.59

60.67

6.33

14

Madhya Pradesh

4097.36

142.12

4400.42

242.04

15

Maharashtra

10352.24

2915.64

7679.78

3013.24

16

Manipur

43.30

0.00

459.67

0.00

17

Meghalaya

83.63

0.00

9473.20

4.81

18

Mizoram

1.51

0.32

919.76

341.93

19

Nagaland

0.00

0.00

2358.90

1075.59

20

Odisha

3484.06

1369.65

3118.31

1187.42

21

Puducherry

161.74

3.28

0.00

0.00

22

Punjab

2446.67

444.94

0.00

0.00

23

Rajasthan

3621.07

1169.15

2050.56

705.32

24

Sikkim

76.25

4.19

398.72

26.77

25

Tamil Nadu

8318.68

5494.24

364.01

162.00

26

Telangana

2471.46

0.00

1088.78

0.00

27

Tripura

1421.84

204.06

2287.24

312.62

28

Uttar Pradesh

37515.60

1525.46

707.79

18.86

29

Uttarakhand

833.82

184.19

92.21

26.27

30

West Bengal

19808.24

10157.16

3482.81

2097.32

Total

135489.00

29967.97

61589.00

13818.32

 


सोनल तुपे/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2200507) आगंतुक पटल : 15
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil