संरक्षण मंत्रालय
वीर नारी, माजी सैनिक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी सशस्त्र सेना ध्वज दिन निधीमध्ये उदारहस्ते योगदान देण्याचे संरक्षणमंत्र्यांचे आवाहन
प्रविष्टि तिथि:
07 DEC 2025 4:55PM by PIB Mumbai
देशात आज 7 डिसेंबर 2025 रोजी सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा होत आहे. सशस्त्र दलांच्या शौर्य, समर्पण, बलिदान आणि अढळ वचनबद्धतेचा सन्मान करण्याचा हा प्रसंग आहे. बाह्य आणि अंतर्गत आव्हानांपासून देशाचे रक्षण करणाऱ्या शूर सैनिकांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी श्रद्धांजली वाहिली आणि सशस्त्र सेना ध्वज दिन निधीमध्ये उदारहस्ते योगदान देऊन माजी सैनिक, दिव्यांग कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी कल्याणकारी कार्यक्रमांना पाठिंबा दिल्याबद्दल नागरिक आणि संघटनांचे मनापासून आभार मानले आहेत. त्यांनी लोकांना निधीमध्ये देणगी देत राहण्याचे आणि माजी सैनिक, वीर नारी आणि शहीद वीरांच्या अवलंबितांच्या पुनर्वसनासाठी आणि कल्याणाप्रति त्यांच्या वचनबद्धतेची पुष्टी करण्याचे आवाहन केले आहे.

"सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त, मी आपल्या सशस्त्र दलांच्या शौर्याला आणि बलिदानाला सलाम करतो. त्यांच्या धाडसामुळे आपल्या राष्ट्राचे रक्षण होते आणि त्यांची निःस्वार्थ सेवा, कधीही फेडू न शकणाऱ्या ऋणांची आठवण करून देते. मी सर्वांना सशस्त्र सेना ध्वज दिन निधीमध्ये उदारहस्ते योगदान देण्याचे आवाहन करतो. तुमच्या पाठिंब्यामुळे त्यांच्या समर्पणाचा सन्मान केला जातो आणि आपले रक्षण करणाऱ्यांना बळ देतो," असे संरक्षणमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यात सशस्त्र दलांची महत्त्वाची भूमिका आणि संरक्षण, तसेच मानवतावादी कार्यात त्यांची असाधारण वचनबद्धता संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी अधोरेखित केली. ऑपरेशन सिंदूर सारख्या मोहिमा म्हणजे त्यांनी दिलेले धैर्याचे पुरावेच आहेत असा विशेष उल्लेख सेठ यांनी केला.


सशस्त्र सेना ध्वज दिन निधीद्वारे गोळा केलेला निधी विवाह, शिक्षण, आरोग्य इत्यादींसाठी आधार आणि आर्थिक मदत देण्यासाठी वापरला जातो. या निधीतील योगदानाला आयकर कायदा, 1961 च्या कलम 80G(5)(vi) अंतर्गत आयकरातून सूट आहे. खालील बँक खात्यांमध्ये चेक/DD/NEFT/RTGS द्वारे योगदान दिले जाऊ शकते.
|
S No
|
Bank Name & Address
|
Account Number
|
IFSC Code
|
|
1
|
Punjab National Bank, Sewa Bhawan, RK Puram New Delhi-110066
|
3083000100179875
|
PUNB0308300
|
|
2
|
State Bank of India RK Puram New Delhi-110066
|
34420400623
|
SBIN0001076
|
|
3
|
ICICI Bank IDA House, Sector-4, RK Puram New Delhi-110022
|
182401001380
|
ICIC0001824
|

***
सुषमा काणे/पर्णिका हेदवकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2200071)
आगंतुक पटल : 30