रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय रेल्वे पुढील 3 दिवसांमध्ये विविध विभागांमध्ये 89 विशेष रेल्वे सेवा (100 पेक्षा जास्त फेऱ्या) चालवणार


मुंबई, दिल्ली, पुणे, हावडा, हैदराबाद इत्यादी मोठ्या शहरांमध्ये येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी विशेष गाड्या; एनईआर दिल्ली आणि मुंबई दरम्यान 6 फेऱ्या चालवणार

प्रविष्टि तिथि: 06 DEC 2025 8:20PM by PIB Mumbai

 

हिवाळ्याच्या हंगामात मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द होणे आणि अतिरिक्त गर्दीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणातील मागणी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने सुरळीत प्रवासाला पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे. आजपासून पुढील तीन दिवस विविध विभागांमध्ये 89 विशेष रेल्वे सेवा (100 हून अधिक फेऱ्या) चालवल्या जातील. यामुळे सुरळीत प्रवासाला मदत होईल आणि रेल्वे प्रवासाच्या वाढत्या मागणीदरम्यान पुरेशी कनेक्टिव्हिटी सुनिश्चित होईल.

प्रवाशांची वाढती मागणी  पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वे 14  विशेष गाड्या चालवणार आहे. यामध्ये  पुढील गाड्यांचा समावेश आहे.  6 आणि 7 डिसेंबर रोजी पुणे-बेंगळुरू-पुणे गाडी क्रमांक 01413/01414 ; 7 आणि 9 डिसेंबर रोजी पुणे-हजरत निजामुद्दीन-पुणे गाडी क्रमांक 01409/01410, 7 आणि 8 डिसेंबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी)-मडगाव-एलटीटी गाडी क्रमांक 01019/01020, 6 आणि 7 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)-हजरत निजामुद्दीन-सीएसएमटी गाडी क्र. 01077/01078; 6 आणि 7 डिसेंबर रोजी एलटीटी-लखनऊ-एलटीटी गाडी क्र. 01015/01016; 6 आणि 7 डिसेंबर रोजी नागपूर-सीएसएमटी-नागपूर 01012/01011; 7 आणि 9 डिसेंबर रोजी गोरखपूर-एलटीटी-गोरखपूर 05587/05588; आणि 10 आणि 12 डिसेंबर रोजी 08245/08246 बिलासपूर-एलटीटी-बिलासपूर.

गेल्या काही दिवसांमध्ये विमान उड्डाणे रद्द झाल्यामुळे वाढलेली मागणी लक्षात घेऊन दक्षिण-पूर्व रेल्वेने विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. यामध्ये गाडी क्रमांक 08073/08074 संत्रागाची-येल्हांका-संत्रागाची यांचा समावेश आहे, 7 डिसेंबर रोजी संत्रागाची येथून 08073 गाडी निघेल  आणि 9 डिसेंबर रोजी येलाहंका येथून 08074 गाडी परतीचा प्रवास सुरु करेल. गाडी क्रमांक 02870/02869  हावडा-सीएसएमटी-हावडा विशेष गाडी क्रमांक 02870 हावडा येथून 6 डिसेंबर रोजी सुटेल आणि 02869 सीएसएमटी येथून 8 डिसेंबर रोजी सुटेल. गाडी क्रमांक 07148/07149  चेरलापल्ली-शालिमार-चेरलापल्ली 07148 ही गाडी 6 डिसेंबर रोजी चेरलापल्लीहून सुटेल आणि 07149 शालिमारहून 8 डिसेंबर रोजी सुटेल.

प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दीचे व्यवस्थापन  करण्यासाठी, दक्षिण मध्य रेल्वे आज, 6 डिसेंबर 2025 रोजी तीन विशेष गाड्या चालवत आहे. चेरलापल्ली ते शालीमार गाडी क्रमांक 07148, सिकंदराबाद ते चेन्नई एग्मोर गाडी क्रमांक 07146 आणि हैदराबाद ते मुंबई एलटीटी गाडी क्रमांक 07150 आज रवाना झाली.

पूर्व रेल्वे हावडा, सियालदाह आणि प्रमुख ठिकाणांदरम्यान विशेष रेल्वे सेवा चालवेल. 03009/03010 हावडा-नवी दिल्ली-हावडा विशेष गाडी क्रमांक 03009 हावडा येथून 6 डिसेंबर रोजी सुटेल आणि 03010 नवी दिल्ली येथून 8 डिसेंबर रोजी सुटेल. 03127/03128 सियालदाह-एलटीटी-सियालदाह विशेष ट्रेन क्रमांक 03127 सियालदाह येथून 6 डिसेंबर रोजी सुटेल आणि 03128 एलटीटी येथून 9 डिसेंबर रोजी सुटेल.

प्रवासाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी पश्चिम रेल्वे सात विशेष गाड्या चालवणार आहे. यामध्ये गाडी क्रमांक 09001/09002  मुंबई सेंट्रल-भिवानी सुपरफास्ट स्पेशल (आठवड्यातून दोनदा), मुंबई सेंट्रल येथून 9 ते 30 डिसेंबर दरम्यान दर मंगळवार आणि शुक्रवारी तर भिवानी येथून 10 ते  31  डिसेंबर दरम्यान दर बुधवारी  आणि शनिवारी  एकूण 14 फेऱ्या चालवल्या जातील. या दरम्यान  ही गाडी बोरिवली, पालघर, वापी, वलसाड, सुरत, भरूच, वडोदरा, रतलाम, मंदसोर, निमच, चित्तौडगड, भिलवाडा, बिजयनगर, नशिराबाद, अजमेर, किशनगढ, जयपूर, गांधी नगर जयपूर, बांदीकुई, अलवार, रेवाडी, चरखी दादरी स्थानकांवर दोन्ही दिशांना थांबेल.

गाडी  क्रमांक  09003/09004  मुंबई सेंट्रल-शकूर बस्ती सुपरफास्ट स्पेशल 8 ते  29  डिसेंबर दरम्यान मुंबई सेंट्रलवरून मंगळवार आणि शुक्रवार वगळता दररोज आणि  9 ते  30 डिसेंबर दरम्यान शकूर बस्तीवरून बुधवार आणि शनिवार वगळता दररोज धावेल, एकूण ३२ फेऱ्या असतील, ज्यांचे आरक्षण  6 डिसेंबर रोजी सुरू होईल. ट्रेन क्रमांक 09730/09729  वांद्रे टर्मिनस-दुर्गापुरा सुपरफास्ट स्पेशल 09730 वांद्रे टर्मिनसवरून 8 डिसेंबर रोजी निघेल आणि 09729  दुर्गापुरा येथून 7 डिसेंबर रोजी निघेल, ज्यांचे आरक्षण 6 डिसेंबर रोजी सुरू होईल. या ट्रेनमध्ये फर्स्ट एसी, एसी -  2  टियर, एसी - 3 टियर, स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड क्लास कोच आहेत.

प्रवाशांच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद म्हणून, भारतीय रेल्वे गोरखपूर येथून अतिरिक्त सेवा चालवणार आहे. ट्रेन क्रमांक 05591/05592  गोरखपूर-आनंद विहार टर्मिनल-गोरखपूर अशा  दोन फेऱ्या चालवेल, 7 आणि  8 डिसेंबर रोजी गोरखपूरहून आणि  8 आणि  9 डिसेंबर रोजी आनंद विहार टर्मिनलवरून निघेल. गाडी  क्रमांक05587/05588 गोरखपूर-एलटीटी-गोरखपूर ही 7 डिसेंबर रोजी गोरखपूरहून आणि 9 डिसेंबर रोजी एलटीटीवरून निघेल.

बिहारहून हिवाळी प्रवास सुलभ करण्यासाठी, पूर्व मध्य रेल्वे पाटणा आणि दरभंगा येथून आनंद विहार टर्मिनलपर्यंत विशेष गाड्या चालवेल. गाडी  क्रमांक  02309/02310 पाटणा-आनंद विहार टर्मिनल-पाटणा ही 6 आणि 8 डिसेंबर रोजी पाटणा येथून आणि 7 आणि  9 डिसेंबर रोजी आनंद विहार टर्मिनलवरून निघेल. गाडी  क्रमांक 02395/02396 पाटणा-आनंद विहार टर्मिनल-पाटणा ही गाडी  क्रमांक  02395  7  डिसेंबर रोजी पाटणा येथून आणि 02396 ही गाडी  8 डिसेंबर रोजी आनंद विहार टर्मिनल येथून सुटेल. ट्रेन क्रमांक 05563/05564 दरभंगा-आनंद विहार टर्मिनल-दरभंगा ही गाडी  क्रमांक 05563 दरभंगा येथून 7 डिसेंबर रोजी  सुटेल आणि 05564 ही गाडी 9 डिसेंबर रोजी आनंद विहार टर्मिनल येथून सुटेल.

आगामी दिवसांमध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी उत्तर पश्चिम रेल्वे एक-ट्रिप पद्धतीने दोन विशेष भाडे गाड्या चालवणार आहे. गाडी  क्रमांक  04725 हिसार-खडकी विशेष ट्रेन 7 डिसेंबर  2025 रोजी हिसारहून सुटेल, तर परतीची गाडी  क्रमांक  04726 खडकी-हिसार विशेष, 8 डिसेंबर 2025 रोजी खडकीहून सुटेल. उत्तर पश्चिम रेल्वे 7 डिसेंबर 2025 रोजी दुर्गापुराहून निघणारी एक-ट्रिप विशेष भाडे विशेष ट्रेन क्रमांक 09729 दुर्गापुरा-वांद्रे टर्मिनस विशेष गाडी चालवेल. परतीची गाडी क्रमांक 09730 वांद्रे टर्मिनस-दुर्गापुरा विशेष, 8 डिसेंबर 2025 रोजी वांद्रे टर्मिनसहून सुटेल.

प्रवाशांच्या सोयीसाठी, उत्तर मध्य रेल्वे प्रयागराज आणि नवी दिल्ली दरम्यान विशेष गाड्या चालवेल. ट्रेन क्रमांक 02417 ही गाडी 6 आणि 8 डिसेंबर रोजी प्रयागराजहून निघेल आणि 7 आणि 9 डिसेंबर रोजी नवी दिल्लीहून 02418 या क्रमांकासह परत येईल आणि दोन्ही दिशेने एकूण दोन फेऱ्या करेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्रमांक 02275 प्रयागराजहून 7 डिसेंबर रोजी  निघेल आणि 8 डिसेंबर रोजी नवी दिल्लीहून  02276 या क्रमांकासह परत येईल आणि प्रत्येक दिशेने एक फेरी करेल.

उत्तर रेल्वे 6  डिसेंबर 2025 रोजी 02439 नवी दिल्ली-शहीद कॅप्टन तुषार महाजन उधमपूर वंदे भारत आणि त्याच दिवशी 02440 उधमपूर-नवी दिल्ली वंदे भारत ही गाडी चालवेल, ज्यामुळे राष्ट्रीय राजधानी आणि जम्मू आणि काश्मीर दरम्यान जलद आणि अधिक आरामदायी प्रवास होईल. उत्तर आणि पश्चिम रेल्वे दरम्यान लांब पल्ल्याची वाहतूक सुलभ करण्यासाठी 04002 नवी दिल्ली-मुंबई सेंट्रल ही ट्रेन 6 डिसेंबर 2025 रोजी धावेल, तर 04001 मुंबई सेंट्रल-नवी दिल्ली ही परतीची गाडी  7 डिसेंबर  2025 रोजी धावेल. उत्तर रेल्वे 6 डिसेंबर 2025 रोजी नियोजित 04080  हजरत निजामुद्दीन-तिरुवनंतपुरम सेंट्रल विशेष ट्रेनद्वारे दिल्लीला दक्षिण रेल्वेशी जोडेल. दक्षिण मध्य रेल्वे नेटवर्कमध्ये प्रादेशिक गतिशीलता मजबूत करण्यासाठी, ट्रेन 07703 चालीपल्ली-जालीमार 7 डिसेंबर २०२५ रोजी धावेल.

हिवाळ्यातील गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी, दुर्ग आणि हजरत निजामुद्दीन दरम्यान एक विशेष ट्रेन धावेल. ट्रेन क्रमांक 08760  दुर्ग येथून 7 डिसेंबर  2025 रोजी निघेल आणि ट्रेन क्रमांक 08761 हजरत निजामुद्दीन येथून 8 डिसेंबर 2025 रोजी निघेल.

***

माधुरी पांगे/सुषमा काणे/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2199929) आगंतुक पटल : 19
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Odia , Kannada , Malayalam