संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत आणि मालदीव यांच्यातील संयुक्त लष्करी सराव ‘एकुवेरिन’ला केरळ मध्ये प्रारंभ

प्रविष्टि तिथि: 02 DEC 2025 6:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 डिसेंबर 2025

भारतीय लष्कर आणि मालदीव राष्ट्रीय संरक्षण दल यांच्यातले संयुक्त लष्करी सराव ‘एकुवेरिन च्या चौदाव्या आवृत्तीला केरळ मधील तिरुवनंतपुरम येथे आजपासून सुरुवात झाली. हा सराव 2 ते 15 डिसेंबर 2025 या कालावधीत होणार आहे. भारतीय लष्कराचे प्रतिनिधित्त्व गढवाल रायफलची  तुकडी करणार असून त्यात 45 अधिकाऱ्यांचा समावेश आहे तर  मालदीवचे प्रतिनिधित्त्व मालदीव राष्ट्रीय संरक्षण दलाच्या तुकडीतील 45 अधिकारी करत आहेत.

दिवेही भाषेत एकुवेरिन म्हणजे 'मित्र' असा होतो. यामधून दोन्ही राष्ट्रांमधील घनिष्ठ मैत्री, परस्पर विश्वास आणि लष्करी सहकार्याचे खोलवर रुजलेले बंध अधोरेखित होतात.  हा सराव वर्ष 2009 पासून दोन्ही देशामध्ये आलटून पालटून आयोजित केला जातो. ‘एकुवेरिन’ हा सराव म्हणजे भारताच्या ‘शेजारी प्रथम’ या धोरणाचा तसेच मित्र राष्ट्रांसोबत कायमस्वरूपी  संरक्षण भागीदारी प्रस्थापित करण्याच्या वचनबद्धतेचे झळाळते उदाहरण आहे.

दोन आठवड्यांच्या या सरावाचा उद्देश जंगले, निम शहरी आणि किनारी प्रदेशातील घुसखोरी विरोधी आणि दहशतवाद विरोधी कारवायांमध्ये परस्पर कार्यक्षमता आणि कार्यान्वयन समन्वय साधणे हा आहे. या सरावामध्ये दोन्ही बाजूंचे सैनिक सहभागी होत असून सर्वोत्तम पद्धती, रणनितीवरील प्रशिक्षण तसेच संयुक्त मोहिमेचे नियोजन यांची देवाणघेवाण करून प्रदेशातील सामायिक सुरक्षा आव्हानांना प्रतिसाद देण्याची त्यांची  क्षमता अधिक बळकट करतील.

हा सराव हिंद महासागर क्षेत्रातील प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यासाठी भारत आणि मालदीव यांच्यातील  वाढते संरक्षण सहकार्य आणि परस्पर वचनबद्धता  प्रतिबिंबित करतो.


सुषमा काणे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2197836) आगंतुक पटल : 8
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil , Malayalam