आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अन्न सुरक्षा अंमलबजावणी आणि भेसळ नियंत्रण बळकटीकरणासाठीच्या उपाययोजना

प्रविष्टि तिथि: 02 DEC 2025 6:42PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 2 डिसेंबर 2025

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाला (एफएसएसएआय) अन्नपदार्थांसाठी विज्ञान-आधारित मानके निश्चित करणे आणि मानवी वापरासाठी सुरक्षित आणि पौष्टिक अन्नाची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी त्यांचे उत्पादन, साठवण, वितरण, विक्री आणि आयात यांचे नियमन करणे बंधनकारक आहे.

कायदा आणि अन्न सुरक्षा आणि मानके नियमन (एफएसएसआर) अंतर्गत निर्धारित मानके, मर्यादा आणि इतर वैधानिक आवश्यकतांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी, एफएसएसएआय, राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील अन्न सुरक्षा प्राधिकरणे आणि त्यांच्या चार प्रादेशिक कार्यालयांमार्फत, नियमितपणे स्थानिक/लक्ष्यित विशेष अंमलबजावणी आणि देखरेख मोहीम आयोजित करते.

एफएसएसएआयने अन्न नमुन्यांच्या चाचणीसाठी 246 नॅशनल अॅक्रिडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज (एनएबीएल) अधिसूचित केले आहेत. याव्यतिरिक्त, प्रामुख्याने केंद्र सरकारचे विभाग आणि संस्थांच्या मालकीच्या 24 रेफरल फूड प्रयोगशाळा अपीलीय नमुन्यांच्या विश्लेषणासाठी अधिसूचित करण्यात आल्या आहेत.

याशिवाय, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अन्न चाचणी पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी, एफएसएसएआयने, "मोबाइल फूड टेस्टिंग लॅबच्या तरतुदीसह देशातील अन्न चाचणी प्रणालीचे बळकटीकरण" (एसओएफटीईएल), या योजने अंतर्गत राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य प्रदान केले आहे. या योजनेंतर्गत, 47 राज्य अन्न चाचणी प्रयोगशाळांचे अद्ययावतीकरण करण्यात आले आहे, तसेच अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता मापदंड, या क्षेत्रात 34 सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या आहेत. चाचणी क्षमतेतील तफावत भरून काढण्यासाठी आणि प्रयोगशाळेच्या पायाभूत सुविधांचा अभाव असलेल्या दुर्गम भागात ऑन-द-स्पॉट (जागच्या जागी) अन्न चाचणी करण्यासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी फिरत्या अन्न चाचणी प्रयोगशाळा (एमएफटीएल) तैनात केल्या आहेत. आतापर्यंत, राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांनी 541 एमएफटीएलसाठी एफएसएसएआयने पुरविलेल्या निधीपैकी 305 एमएफटीएल खरेदी आणि तैनात केले आहेत.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

 

सुषमा काणे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(रिलीज़ आईडी: 2197821) आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी