पंतप्रधान कार्यालय
बेगम खालिदा झिया यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होण्यासाठी पंतप्रधानांनी केली सदिच्छा व्यक्त
प्रविष्टि तिथि:
01 DEC 2025 10:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 डिसेंबर 2025
बांगलादेशच्या सार्वजनिक जीवनासाठी अनेक वर्षांपासून योगदान देणाऱ्या बेगम खालिदा झिया यांच्या प्रकृतीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आणि त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी सदिच्छा व्यक्त केली आहे. यावेळी भारत सर्वतोपरी पाठिंबा देण्यास तयार आहे, असे मोदी यांनी नमूद केले आहे.
पंतप्रधानांनी आपल्या एक्स पोस्टवर म्हटले, "बांगलादेशच्या सार्वजनिक जीवनासाठी अनेक वर्षांपासून आपले योगदान देणाऱ्या बेगम खालिदा झिया यांच्या प्रकृतीबद्दल माहिती मिळाल्यानंतर मला खूप चिंता वाटली. त्यांच्या प्रकृतीत लवकर होण्यासाठी आमची मनोभावे प्रार्थना आणि सदिच्छा. यावेळी भारत सर्व प्रकारे मदत करण्यास तयार आहे."
नितीन फुल्लुके / संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2197526)
आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam