अर्थ मंत्रालय
अटल पेन्शन योजनेने ओलांडला 8.34 कोटींहून अधिक नावनोंदणीचा टप्पा ; महिलांचा सहभाग 48%
प्रविष्टि तिथि:
01 DEC 2025 9:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 डिसेंबर 2025
अटल पेन्शन योजना (एपीवाय) 09.05.2015 रोजी सुरू करण्यात आली, ज्याचा उद्देश सर्व भारतीयांसाठी, विशेषतः गरीब, वंचित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी एक सर्वसमावेशक सामाजिक सुरक्षा प्रणाली निर्माण करणे आहे . ही योजना बँक किंवा टपाल खात्यात बचत खाते असलेल्या 18 ते 40 वर्षे वयोगटातील सर्व नागरिकांसाठी खुली आहे.
31.10.2025 रोजी अटल पेन्शन योजनेअंतर्गत एकूण नोंदणी 8,34,13,738 झाली आहे. या योजने अंतर्गत महिलांची एकूण नोंदणी 4,04,41,135 असून ती एकूण नोंदणीच्या 48% आहे.
ग्रामीण आणि दुर्गम भागांसह देशभरात अटल पेन्शन योजनेबाबत जागरूकता आणि व्याप्ती वाढवण्यासाठी सरकार आणि पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) यांनी खालील पावले उचलली आहेत:
i. जागरूकता वाढवण्यासाठी मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि समाज माध्यमावर नियमित जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात.
ii. अटल पेन्शन योजना सदस्यांची माहिती पुस्तिका 13 प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध.
iii. पात्र लाभार्थ्यांमध्ये अटल पेन्शन योजनेचा प्रसार करण्यासाठी बँकिंग प्रतिनिधी आणि बँकांचे क्षेत्रीय कर्मचारी, बचत गट सदस्य, राज्य ग्रामीण उपजीविका अभियानातील बँक-सखी यांच्यासाठी आभासी क्षमता निर्माण कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.
iv. भारत सरकारची विविध मंत्रालये, राष्ट्रीय वित्तीय शिक्षण केंद्र (NCFE), राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (NABARD), राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (NRLM) आणि राज्य ग्रामीण उपजीविका अभियानातील (SRLMs) बँक-सखी अटल पेन्शन योजनेबद्दल जागरूकता आणि व्याप्ती वाढवण्यासाठी कार्यरत आहेत.
v. ई-एपीवाय, नेट-बँकिंग, मोबाइल ॲप आणि बँकेचे वेब-पोर्टल यासारखे ऑनलाइन चॅनेल सक्रिय करुन ऑनलाईन नोंदणी सुलभ केली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.
सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2197313)
आगंतुक पटल : 20