युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

‘माय भारत’ पोर्टलवर 2 कोटींहून अधिक तरुणांनी केली नोंदणी

प्रविष्टि तिथि: 01 DEC 2025 9:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 डिसेंबर 2025

26 नोव्हेंबर 2025 पर्यंत ‘माय भारत’ पोर्टलवर (https://mybharat.gov.in/) एकूण 2.05 कोटी जणांनी नोंदणी केली आहे.

‘माय भारत’ पोर्टलद्वारे देशभरातील तरुणांना डिजिटल प्रवेश आणि मोबाइल-अनुकूल सेवा उपलब्ध करून देण्यासाठी डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनसोबत एक सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यातील मुख्य घटक खालील प्रमाणे आहेत:

1. अँड्रॉइड आणि आयओएससाठी पूर्णपणे कार्यक्षम मोबाइल ॲप्लिकेशन;

2. कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित स्मार्ट सीव्ही बिल्डर आणि डिजिटल प्रोफाइल;

3. कार्यक्रम आयोजित करणाऱ्या संस्था आणि शैक्षणिक संस्था यांच्यासाठी विश्लेषण सुविधा असलेले एकात्मिक डॅश बोर्ड;

4. स्पीच टू टेक्स्ट, व्हॉइस असिस्टेड नेव्हिगेशन आणि एआय चॅटबॉट्स यासारख्या प्रगत सुविधा;

5. तुमच्या जवळ आणि कोणत्याही विशिष्ट क्षेत्रात संधी शोधण्यासाठी लोकेशन इंटेलिजन्स आणि जिओ-टॅग;

6. युवकांच्या सहभागासाठी लर्निंग मॉड्यूल आणि प्रश्नमंजुषा;

7. भारत सरकारच्या आधार, डिजिलॉकर, भाषिणी आणि मायगव्ह यासारख्या प्लॅटफॉर्मचे अखंड एकत्रीकरण.

8. डिजिटल दरी भरून काढण्यासाठी 22 भाषांमध्ये पोर्टलची उपलब्धता, मोबाइल ॲप्लिकेशन आणि इतर सरकारी प्लॅटफॉर्मशी परस्परसंवाद या प्रमुख उपक्रमांचा समावेश

‘माय भारत’ला अधिक बळकट करण्यासाठी, सरकारने पुढील उपक्रम हाती घेतले आहेत:

1. युवा सहभाग उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी, समन्वय आणि देखरेख सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा पातळीवर ‘माय भारत’ची संघटनात्मक रचना मजबूत करणे.

2. इंटर्नशिप, अनुभवाधारित शिक्षण, सामुदायिक सेवा आणि कौशल्य विकासाच्या संधी वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्रालये, राज्य सरकारे, उद्योग भागीदार, शैक्षणिक संस्थांशी सहकार्य सुलभ करणे.

3. लक्ष्यित पोहोच आणि डिजिटल सक्षमीकरण उपक्रमांद्वारे ग्रामीण, आदिवासी आणि सामाजिकदृष्ट्या वंचित गटांचा सहभाग सुनिश्चित करून समावेशकता वाढवण्याचे प्रयत्न.

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी ही माहिती आज लोकसभेत लेखी उत्तरात दिली.

 

सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 


(रिलीज़ आईडी: 2197306) आगंतुक पटल : 3
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , हिन्दी