'अ पोएट’ साठी उबेईमार रिओस यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा (पुरुष) रौप्य मयूर अर्थात सिल्व्हर पीकॉक पुरस्कार
उबेईमार रिओस यांनी आपल्या पदार्पणातच कसदार अभिनयाचे दर्शन घडवत संघर्षात झुंजणारा पराभूत कवी साकारल्याबद्दल ज्युरी सदस्यांनी त्यांचे कौतुक केले
कला आणि अस्तित्व यांमधील प्राचीन संघर्षाला अनोख्या पद्धतीने उलगडून दाखवणाऱ्या ‘अ पोएट’या चित्रपटाचे ज्युरींकडून प्रशंसा
56 व्या भारतीय चित्रपट महोत्सवात उबेईमार रिओस यांना ए पोएट या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा (पुरुष) सिल्व्हर पीकॉक,रौप्य मयूर पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात उत्कृष्ट भूमिकेसाठी प्राप्त झाला आहे. रौप्य मयूर चषक, प्रमाणपत्र आणि 10,00,000 रुपयांचें रोख पारितोषिक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि माहिती आणि प्रसारण आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू, इफ्फी ज्युरीचे अध्यक्ष राकेश ओमप्रकाश मेहरा आणि महोत्सवाचे संचालक शेखर कपूर उपस्थित होते.

अ पोएट चित्रपटात कला आणि अस्तित्व यांमधील प्राचीन संघर्षाला अनोख्या आणि वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने उलगडून दाखवले आहे, असे मत ज्युरींनी व्यक्त केले. कवी ऑस्कर एकेकाळचा गाजलेला कवी असतो मात्र ज्यांनी कधीकाळी त्याला साथ दिली त्यांच्याबद्दलच्या त्याच्या कडवट रागामुळे त्याला आता गत प्रतिष्ठेला मुकावे लागले आहे. उबेईमार रिओस यांनी आपल्या पदार्पणातच कसदार अभिनयाचे दर्शन घडवत एका भावनात्मक संघर्षात झुंजणारा पराभूत कवी साकारला असून एकदा तो एका किशोरवयीन मुलीच्या संपर्कात येतो, आणि ती त्याचे आयुष्यच बदलून टाकते. यामध्ये पुढे पुढे अनेक आव्हाने असली तरी हा चित्रपट आणि उबेमारनी साकारलेली भूमिका अत्यंत प्रेरणादायी आहे आणि शेवटी विलक्षण पुनरुत्थान घडवून आणणारे आहे.”
या सन्मानामुळे उबेईमार रिओस यांचा अभिनय 56व्या इफ्फी मधील सर्वात उल्लेखनीय अभिनय गौरवांपैकी एक ठरतो.
अ पोएट चा सारांश
ऑस्कर रेस्ट्रेपो हा एक जगाच्या विस्मृतीत गेलेला कोलंबियन कवी आहे आणि एका भावनिक संघर्षाचा सामना करत आहे, एकेकाळी प्रसिद्धीच्या शिखरावर असलेला हा कवी आता मेडेलिनमध्ये फिरतो, कुटुंबाकडून त्याची थट्टा केली जाते आणि साहित्यिक जगतात त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाते. जेव्हा तो गरीब पार्श्वभूमीतून आलेल्या एका प्रतिभावान किशोरवयीन कवयित्री युरलाडीला भेटतो तेव्हा मात्र त्याचे आयुष्य बदलते. आपली स्वप्ने तिच्या रूपाने पूर्ण करण्याच्या आशेने ऑस्कर तिला मार्गदर्शन करतो आणि युरलाडीला जेव्हा यश मिळू लागते तेव्हा उच्चभ्रू संस्था तिच्या प्रतिमेचा वापर आपल्या प्रतिष्ठेसाठी करतात, ती मात्र आपल्या कुटुंबाला मदत करण्यावर लक्ष केंद्रित करते. या चित्रपटात उपहास आणि भावना यांचे मिश्रण आहे, हा चित्रपट अयशस्वी महत्त्वाकांक्षा, मार्गदर्शन आणि कला आणि जगण्यातील संघर्षाचा शोध घेतो.
अ पोएट च्या पत्रकार परिषदेची लिंक
इफ्फीविषयी
वर्ष 1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियात सर्वप्रथम सुरु झालेला आणि चित्रपटांशी संबंधित असा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) ही संस्था तसेच गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेला हा महोत्सव आता, जेथे पुनर्संचयित अभिजात कलाकृती धाडसी प्रयोगांना सामोऱ्या जातात आणि दिग्गज कलाकार निर्भय नव-कलाकारांसोबत एकत्र येऊन काम करतात, अशा जागतिक चित्रपटीय शक्तीकेंद्राच्या रुपात उदयाला आला आहे. इफ्फीला खऱ्या अर्थाने चमकदार स्वरूप देणारे घटक म्हणजे त्यातील विजेसारख्या तळपणाऱ्या मिश्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, मास्टर क्लासेस,श्रद्धांजलीपर उपक्रम तसेच कल्पना, व्यवहार आणि सहयोगी संबंधांना झेप घेऊ देणारा, चैतन्याने भारलेला वेव्हज चित्रपट बाजार. गोव्यातील जबरदस्त आकर्षक समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेला महोत्सवाचा 56 वा भाग भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाजांचा झळाळता पिसारा घेऊन जागतिक मंचावर भारताच्या सर्जक प्रतिभेचा गुंगवून टाकणारा सोहळा सादर करत आहे.
***
निलिमा चितळे/भक्ती सोनटक्के/परशुराम कोर
रिलीज़ आईडी:
2196173
| Visitor Counter:
15