“धीस टेम्पटिंग मॅडनेस” च्या चमूने इफ्फी मध्ये चित्रपटातील मनोवैज्ञानिक वादळाचा केला खुलासा
कलाकार आणि तांत्रिक चमूने स्मृती, स्त्रीद्वेष, अस्तित्वाची लढाई आणि सत्य घटनांचे रुपांतर करताना येणारी जबाबदारी यावर चर्चा केली
वेदना, दृष्टिकोन आणि या कहाणीचे आजच्या दृष्टीने महत्त्व यावर एक खिळवून ठेवणारा संवाद
#IFFIWood, 27 नोव्हेंबर 2025
'धीस टेम्पटिंग मॅडनेस' वर इफ्फी मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत चित्रपटाच्या भावनिक, जिव्हाळ्याच्या गोष्टी आणि कथन केल्यानंतरही बराच काळ रेंगाळणाऱ्या सत्यांनी भरलेल्या गोष्टींचा प्रतिध्वनी अनुभवायला मिळाला. या निमित्ताने स्मृती, भावना आणि वास्तव धूसर करणारी एक खरी आणि वेदनादायक कथा पडद्यावर आणण्याबद्दल दिग्दर्शक जेनिफर मॉन्टगोमेरी, निर्माता अँड्र्यू डेव्हिस आणि अभिनेते सूरज शर्मा आणि झेनोबिया श्रॉफ यांनी एकत्र चर्चा केली.
जेनिफर यांनी अत्यंत प्रामाणिकपणे संवादाची सुरुवात केली. हा चित्रपट “खऱ्या घटनेवर आधारित आणि दुर्दैवी”असल्याचे ती म्हणाली. ही कथा बोलायलाही अवघड आहे, असे सांगत त्यांनी अधोरेखित केले की सिनेमा शब्दांनी व्यक्त न होणाऱ्या भावनांना संदर्भ देऊ शकतो. “प्रेक्षकांना घडलेल्या घटनेचे ओझे समजून घेण्यासाठी एक अवकाश निर्माण करणे आम्हाला महत्त्वाचे वाटले,” असे त्या म्हणाली.

खऱ्या जीवनातील आघाताला दृश्य स्वरूपात दाखवण्याच्या आव्हानाबद्दल अँड्र्यू डेव्हिस यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सत्य कथा सांगताना एक वेगळीच जबाबदारी असते. कथाकार म्हणून आपण फक्त एखादी घटना पुन्हा सांगत नाही. तर आपण त्यामागचा अर्थ, त्याची व्याख्या आणि मनात रेंगाळणारे प्रश्न शोधण्याचा प्रयत्न करतो. हाच खरा प्रयत्न असतो.”
अभिनेता सुरज शर्मा यांच्यासाठी हा चित्रपट केवळ एक प्रोजेक्ट नव्हे तर वैयक्तिक गोष्ट होती. "बऱ्याच लोकांसाठी हा अनुभव सार्वत्रिक आहे" असे म्हणत त्यांनी मानसिक आणि भावनिक अत्याचाराच्या भयानक प्रमाणाबद्दल सांगितले. "अकरा टक्के महिला यातून जातात, भारतात त्याहूनही जास्त. यासंदर्भातील संभाषण सुरू करणाऱ्या चित्रपटाचा भाग असणे हे आपल्याला महत्त्वाचे वाटले." असे त्यांनी सांगितले.
त्यांनी स्वतःच्या आयुष्यातील एक क्षण सामायिक केला, त्यांनी एका मित्राच्या बहिणीला अत्याचार सहन करताना पाहिले आणि तिला या परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत केली. "हा चित्रपट म्हणजे प्रत्यक्षात ज्यांनी असा त्रास सहन केला आहे त्यांना वाहिलेली श्रद्धांजली आहे," असे ते म्हणाले.
झेनोबिया श्रॉफ यांनी मात्र आपल्या भूमिकेचे वर्णन सूक्ष्मपणे आणिअतिशय तडफेने केले. भारतीय आईची भूमिका साकारताना—वरकरणी मुलीला साथ देणारी, पण आतल्या आत सांस्कृतिक मूकपणाच्या दडपणाखाली दबलेली—ही स्थिती किती गुंतागुंतीची आहे, हे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक वेळी ही गोष्ट कोणाला सांगू नका असा भाव दडलेला असतो. एक दडलेला स्त्रीद्वेष — जो अनेकदा माताही नकळत आपल्या मनात सामावून घेतात. “आपण स्त्रियांना सतत कमीपणा घ्यायला सांगणे थांबवायला हवे तसेच आता आपल्या पुरुषांना अधिक चांगले बनायला सांगण्याची वेळ आली आहे.” या सूत्रावर प्रकाश टाकणे हे यामागील ध्येय होते, असे त्या म्हणाल्या.

या चित्रपटातील पात्रांची पार्श्वभूमी भारताभोवती केंद्रित असली तरी कथा मात्र सार्वत्रिक होती, आम्ही भूमिकेसाठी अत्यंत उत्तम व्यक्ती सिमोन अॅशले ची निवड केली आणि ती भारतीय वंशाची होती, जे सांस्कृतिक तपशील तिला माहित नव्हते, त्याविषयी उर्वरित कलाकरांनी तिला सहाय्य केले. असे जेनिफर यांनी सांगितले.
तांत्रिक बाजूसंबंधी बोलताना चमूने मियाच्या विस्मरणाच्या अवस्थेला आणि तिच्या भ्रमित जाणिवांना प्रतिबिंबित करण्यासाठी ‘इंटरकट मेमरी’चा वापर कसा केला, याचे वर्णन केले. “जेव्हा एखाद्याचा स्मृतिभ्रंश होतो, तेव्हा काहीच अचूक राहत नाही. म्हणूनच आम्ही असे दृश्यरूप बांधले जे सतत वर्तमान आणि तुकड्यातुकड्यात झालेल्या आठवणींमध्ये फिरत राहते.” असे जेनिफर यांनी सांगितले.
जेनिफर यांनी हा चित्रपट करताना व्हर्जिनिया वुल्फकडून काही प्रेरणा घेतली होती का? असे एका एका पत्रकाराने विचारले असता आपण अद्याप तशी प्रेरणा घेतली नसली तरी आता त्याबद्दल वाचन करायचे आहे आणि तो दृष्टिकोन पहायचा आहे असे त्यांनी मंदस्मित करताना सांगितले.
या कथेच्या भावनात्मक गाभ्याबद्दल बोलताना जेनिफर यांनी मार्मिकपणे सांगितले की एक लेखिका -दिग्दर्शिका म्हणून माझी भूमिका प्रत्येक पात्रात माणुसकी शोधण्याची आहे. आपल्या सर्वांना कधी ना कधी वेडेपणाचा मोह होतो."
अँड्र्यू यांनी या सत्राचा शेवट तग धरण्याच्या आणि पुनर्जन्माच्या भावनेवर केला: “खऱ्या घटनांवर प्रेरित असलेल्या हा चित्रपट म्हणजे केवळ वेदनेची कथा नाही; तो सामर्थ्याचाही पुरावा आहे. माणसं बदलू शकतात, आणि ती अधिक मजबूत बनू शकतात.” असे ते म्हणाले.
इफ्फीविषयी
वर्ष 1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियात सर्वप्रथम सुरु झालेला आणि चित्रपटांशी संबंधित असा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) ही संस्था तसेच गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेला हा महोत्सव आता, जेथे पुनर्संचयित अभिजात कलाकृती धाडसी प्रयोगांना सामोऱ्या जातात आणि दिग्गज कलाकार निर्भय नव-कलाकारांसोबत एकत्र येऊन काम करतात, अशा जागतिक चित्रपटीय शक्तीकेंद्राच्या रुपात उदयाला आला आहे. इफ्फीला खऱ्या अर्थाने चमकदार स्वरूप देणारे घटक म्हणजे त्यातील विजेसारख्या तळपणाऱ्या मिश्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, मास्टर क्लासेस,श्रद्धांजलीपर उपक्रम तसेच कल्पना, व्यवहार आणि सहयोगी संबंधांना झेप घेऊ देणारा, चैतन्याने भारलेला वेव्हज चित्रपट बाजार. गोव्यातील जबरदस्त आकर्षक समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेला महोत्सवाचा 56 वा भाग भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाजांचा झळाळता पिसारा घेऊन जागतिक मंचावर भारताच्या सर्जक प्रतिभेचा गुंगवून टाकणारा सोहळा सादर करत आहे.
For more information, click on:
IFFI Website: https://www.iffigoa.org/
PIB’s IFFI Microsite: https://www.pib.gov.in/iffi/56/
PIB IFFIWood Broadcast Channel: https://whatsapp.com/channel/0029VaEiBaML2AU6gnzWOm3F
X Handles: @IFFIGoa, @PIB_India, @PIB_Panaji
* * *
PIB IFFI CAST AND CREW | गोपाळ चिप्पलकट्टी/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे | IFFI 56
रिलीज़ आईडी:
2195872
| Visitor Counter:
6