वस्त्रोद्योग मंत्रालय
केंद्र सरकारने वस्त्रोद्योग क्षेत्रात संशोधन, नवोन्मेष आणि स्पर्धात्मकता बळकट करण्यासाठी 'टेक्स-रॅम्प्स' योजनेला दिली मंजुरी
Posted On:
27 NOV 2025 5:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2025
केंद्र सरकारने वस्त्रोद्योग क्षेत्रात संशोधन, नवोन्मेष आणि स्पर्धात्मकता बळकट करण्यासाठी वस्त्रोद्योग केंद्रित संशोधन, मूल्यांकन, देखरेख, नियोजन आणि स्टार्ट-अप (टेक्स-आरएएमपीएस ) योजनेला मंजुरी दिली आहे.
आर्थिक वर्ष 2025-26 ते 2030-31 या कालावधीसाठी एकूण 305 कोटी रुपये खर्चाची ही योजना आगामी वित्त आयोगाच्या चक्रासोबतच संपेल आणि ती केंद्रीय क्षेत्र योजना म्हणून अंमलात आणली जाईल आणि त्यासाठी वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून पूर्णपणे निधी दिला जाईल.
या योजनेची घोषणा करताना, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह म्हणाले की, टेक्स-रॅम्प्स योजना संशोधन, डेटा आणि नवोन्मेष यांना एकत्र आणते जेणेकरून भारताच्या वस्त्रोद्योग क्षेत्राला सक्षम बनवता येईल आणि शाश्वतता, तंत्रज्ञान आणि स्पर्धात्मकतेमध्ये देशाला जगात आघाडीचे स्थान मिळवून देता येईल.
भारताच्या वस्त्रोद्योग आणि पोशाख परिसंस्थेला भविष्यासाठी सक्षम बनवण्याच्या उद्देशाने, संशोधन, डेटा प्रणाली, नवोन्मेष सहाय्य आणि क्षमता विकासातील महत्वपूर्ण तफावत दूर करण्यासाठी टेक्स-रॅम्प्सची रचना केली आहे.
टेक्स-रॅम्प्सचे प्रमुख घटक
1. संशोधन आणि नवोन्मेष
भारताच्या नवोन्मेष क्षमतेला चालना देण्यासाठी स्मार्ट टेक्सटाइल, शाश्वतता, प्रक्रिया कार्यक्षमता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानातील प्रगत संशोधनाला प्रोत्साहन.
2. डेटा, विश्लेषण आणि निदान
पुरावा आधारित धोरण आखणी सुलभ करण्यासाठी रोजगार मूल्यांकन, पुरवठा साखळी मॅपिंग आणि भारतातील सर्व वयोगटाच्या अभ्यासासह मजबूत डेटा प्रणालीची निर्मिती.
3. एकात्मिक वस्त्रोद्योग सांख्यिकी प्रणाली
संरचित देखरेख आणि धोरणात्मक निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी एक वास्तविक वेळ , एकात्मिक डेटा आणि विश्लेषण प्लॅटफॉर्म.
4. क्षमता विकास आणि ज्ञान परिसंस्था
राज्यस्तरीय नियोजन बळकट करणे , सर्वोत्तम पद्धतींचा प्रसार, क्षमता निर्मिती कार्यशाळा आणि क्षेत्रीय कार्यक्रमांचे आयोजन.
5. स्टार्ट-अप आणि नवोन्मेष सहाय्य
उच्च-मूल्य असलेले वस्त्रोद्योग स्टार्ट-अप्स आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी इनक्यूबेटर, हॅकेथॉन आणि शैक्षणिक-उद्योग सहकार्यासाठी सहाय्य
अपेक्षित परिणाम
टेक्स-रॅम्प्स योजनेतून पुढील गोष्टी अपेक्षित आहेत:
· जागतिक बाजारपेठेत भारताची स्पर्धात्मकता वाढवणे
· संशोधन आणि नवोन्मेष परिसंस्था मजबूत करणे
· डेटा-चालित धोरणनिर्मिती सुधारणे
· रोजगाराच्या संधी निर्माण करणे
· राज्ये, उद्योग, शैक्षणिक संस्था आणि सरकारी संस्थांमध्ये दृढ सहकार्याला चालना देणे
सुवर्णा बेडेकर/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2195420)
Visitor Counter : 11