अर्थ मंत्रालय
एकीकृत पेन्शन योजनेचा पर्याय निवडण्यासाठी आता थोडाच अवधी शिल्लक
पात्र कर्मचारी आणि एनपीएस सदस्यांना सीआरए प्रणालीद्वारे किंवा प्रत्यक्ष अर्जाद्वारे नोडल अधिकाऱ्यांकडे विनंती दाखल करण्यासाठी 30.11.25 पर्यंत मुदत
Posted On:
25 NOV 2025 1:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2025
भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाने 24.01.2025. रोजी एफएक्स-1/3/2024-पीआर द्वारे पात्र केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एकीकृत पेन्शन योजनेबाबत (यूपीएस) अधिसूचित केले आहे.
यूपीएसचा पर्याय निवडण्याची अंतिम मुदत जवळ येत असताना, सर्व संबंधित एनपीएस ग्राहकांना अधिसूचित केले जाते की:
1. त्यांनी आपली यूपीएस विनंती सीआरए प्रणालीद्वारे ऑनलाइन दाखल करावी; किंवा
2. संबंधित नोडल कार्यालयात 30.11.2025 रोजी किंवा त्यापूर्वी योग्यरित्या भरलेला प्रत्यक्ष अर्ज सादर करावा.
नोडल कार्यालयांमार्फत सर्व विनंत्यांवर विहित प्रक्रियेनुसार प्रक्रिया करण्यात येईल.
यूपीएस अंतर्गत मिळणाऱ्या महत्त्वाच्या फायद्यांमध्ये पर्याय बदलणे, कर सवलत, राजीनामा आणि निवृत्तीनंतरचे अनिवार्य फायदे आणि इतर बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या सर्व पात्र कर्मचाऱ्यांना आणि माजी निवृत्त होऊ घातलेल्यांना एनपीएस अंतर्गत लाभ मिळविण्यासाठी त्यांचे यूपीएस अर्ज वेळेत सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
यूपीएसचा पर्याय निवडल्यास, कर्मचाऱ्यांना नंतर, अर्थात त्यांची तशी इच्छा असल्यास पुन्हा एनपीएसचा पर्याय निवडण्याची मुभा कायम राहील,
टीप: पात्र कर्मचारी आणि एनपीएस अंतर्गत पूर्वी निवृत्त झालेल्यांसाठी यूपीएस निवडण्याची शेवटची तारीख 30.11.2025 ही आहे
* * *
सुवर्णा बेडेकर/मंजिरी गानू/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2194029)
Visitor Counter : 16