गृह मंत्रालय
महिला कबड्डी विश्वचषक 2025 जिंकणाऱ्या भारतीय महिला कबड्डी संघाचे केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी केले हार्दिक अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
24 NOV 2025 10:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2025
महिला कबड्डी विश्वचषक 2025 जिंकणाऱ्या भारतीय महिला कबड्डी संघाचे केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.
एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, “आपल्या महिला कबड्डी संघाने इतिहास घडवला असल्याने हा अतिशय अभिमानाचा क्षण आहे. महिला विश्वचषक कबड्डी 2025 मिळवल्याबद्दल संपूर्ण संघाचे अभिनंदन. तुमच्या उल्लेखनीय विजयामुळे भारताची क्रीडा प्रतिभा एकमेवाद्वितीय असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. तुमच्या भावी वाटचालीसाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा.”
निलीमा चितळे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2193874)
आगंतुक पटल : 39