पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

इंडिया एनर्जी वीक 2026 साठी प्रसारमाध्यमे नोंदणी आता सुरू

Posted On: 24 NOV 2025 8:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2025

दक्षिण गोव्यातील बेतुलजवळील ओएनजीसी - प्रगत प्रशिक्षण संस्थेत 27-30 जानेवारी दरम्यान होणाऱ्या इंडिया एनर्जी वीक (आयईडब्ल्यू) 2026 साठी प्रसारमाध्यमे नोंदणी आता खुली आहे. माध्यम प्रतिनिधी येथे नोंदणी करू शकतात:  https://www.indiaenergyweek.com/media-center/media-registration/

आयईडब्ल्यू 2026 हा वर्षातील सर्वात मोठा ऊर्जा मेळावा असणार आहे ज्यामध्ये 75,000 हून अधिक ऊर्जा व्यावसायिक, 550+ जागतिक वक्ते आणि 120 हून अधिक परिषद सत्रे असतील. या कार्यक्रमात जागतिक ऊर्जा नेत्यांमध्ये ऊर्जा सहकार्य, समता, नेतृत्व, गुंतवणूक आणि डिजिटल सीमांवर धोरणात्मक चर्चा होईल.

या प्रदर्शनात 700+ आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक प्रदर्शक, 12+ देशांचे मंडप आणि 12 संकल्पनात्मक दालने असतील ज्यात ऊर्जा मूल्य साखळीतील नवोपक्रमांचे व्यापक दृश्य सादर होईल.

माध्यम प्रतिनिधींना 70+ धोरणात्मक परिषद सत्रे, संपूर्ण प्रदर्शन, जागतिक नेत्यांसोबत मुलाखतीच्या संधी, दैनंदिन माहिती निवेदन आणि समर्पित माध्यम केंद्राची सुविधा उपलब्ध असेल.

निलीमा चितळे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2193780) Visitor Counter : 4