गृह मंत्रालय
जागतिक मुष्टियुद्ध चषक फायनल्समध्ये 9 सुवर्ण, 6 रौप्य आणि 5 कांस्यपदकांसह 20 पदके जिंकल्याबद्दल भारतीय चमूचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले हार्दिक अभिनंदन
भारतीय चमूने आपल्या देशाचा गौरव आणखी उंचावला
आपल्या कठोर परिश्रम, वचनबद्धता आणि कौशल्यातून या चमूने उदयोन्मुख खेळाडूंसाठी प्रेरणादायी सुवर्ण मार्ग प्रशस्त केला
Posted On:
24 NOV 2025 4:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2025
जागतिक मुष्टियुद्ध चषक फायनल्समध्ये भारतीय चमूने 9 सुवर्ण, 6 रौप्य आणि 5 कांस्यपदकांसह 20 पदके जिंकल्याबद्दल केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री, अमित शहा यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले.
एक्स या समाज माध्यमावरील संदेशात अमित शहा म्हणाले :
"आपल्या मुष्टीयोद्ध्यांनी चमकदार कामगिरी केली! जागतिक मुष्टियुद्ध चषक फायनल्स मध्ये 9 सुवर्ण, 6 रौप्य आणि 5 कांस्यपदकांसह 20 पदके जिंकणाऱ्या आपल्या चमूचे हार्दिक अभिनंदन. या चमूने आपल्या देशाचा गौरव आणखी उंचावला. आपल्या कठोर परिश्रम, वचनबद्धता आणि कौशल्यातून या चमूने उदयोन्मुख खेळाडूंसाठी प्रेरणादायी सुवर्ण मार्ग प्रशस्त केला आहे . तुमच्या मार्गावर यश सदैव झळकत राहो.”
सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2193613)
Visitor Counter : 9