अल्पसंख्यांक मंत्रालय
अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय 22.11.2025 रोजी मुंबईत राष्ट्रीय हज परिषद करणार आयोजित
राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील हज समित्या आणि भारतीय हज कमिटी यांच्यातील सहकार्य बळकट करण्यावर तसेच सर्व भारतीय हज यात्रेकरूंसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर परिषदेत दिला जाणार भर
Posted On:
21 NOV 2025 2:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 21 नोव्हेंबर 2025
अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय उद्या, शनिवार, 22 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईतील हज हाऊस येथे राष्ट्रीय हज परिषद आयोजित करणार आहे. या परिषदेचे अध्यक्षस्थान अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. चंद्रशेखर कुमार भूषवणार आहेत. देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील हज समित्यांचे कार्यकारी अधिकारी 2026 च्या हज यात्रेच्या तयारीचा व्यापक आढावा घेण्यासाठी एकत्र येणार आहेत.
भारत दरवर्षी हे यात्रेला 1,75,000 हून अधिक हज यात्रेकरू पाठवते. सर्व भारतीय हज यात्रेकरूंना सुरक्षित, सुरळीत आणि सन्मानपूर्वक तीर्थयात्रेचा अनुभव मिळवून देण्यासाठी भारत सरकार वचनबद्ध आहे. अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली, हज कमिटी ऑफ इंडिया (एचसीओआय) यात्रेकरूंसाठी सुविधा, समन्वय आणि सेवा प्रदान करणे सुलभ करण्यासाठी वर्षभर काम करते. उद्याची परिषद राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील हज कमिटी आणि भारत हज कमिटी ऑफ इंडिया यांच्यातील सहकार्य मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करेल.त्याचबरोबर ती महत्त्वाच्या कार्यात्मक उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्यावर लक्ष केंद्रित करेल. परिषदेच्या कार्यसूचीतील प्रमुख मुद्द्यांमध्ये हे समाविष्ट आहे:
निवास व्यवस्था आणि लॉजिस्टिक्स
• निवास व्यवस्थांचा आढावा आणि संबंधित सौदी आणि देशांतर्गत यंत्रणाशी समन्वय.
•सर्व यात्रेकरूंसाठी वेळेवर आणि आरामदायी सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी वाहतूक नियोजनाचे मूल्यांकन.
वाहतूक आणि सामान व्यवस्थापन
•यात्रेकरूंच्या सुरळीत ये-जा साठी प्रणाली मजबूत करणे.
•सामान हाताळणी अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि वेळेत होण्यासाठी प्रोटोकॉल्सची अंमलबजावणी करणे.
हज सहाय्यक आणि निरीक्षकांचे प्रशिक्षण
•प्रशिक्षण मॉड्यूल आणि तयारीचे मूल्यांकन.
•सेवा वितरण, शिस्त आणि कार्यक्रमालीचे काटेकोर पालन यावर भर.
वैद्यकीय तयारी
•सर्व यात्रेकरूंची व्यापक आरोग्य तपासणी.
•केएसए मार्गदर्शक तत्त्वांनुसार लसीकरण आणि प्रमाणपत्र प्रक्रिया.
• वैद्यकीय पथके आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांची तैनाती, तयारी आणि प्रभावी समन्वय.
या परिषदेचे उद्दिष्ट त्रुटी शोधणे, प्रक्रिया सुलभ करणे आणि आंतर-एजन्सी सहकार्य वाढवणे आहे, जेणेकरून हज 2026 सुरक्षा, कार्यक्षमता आणि काळजीच्या सर्वोच्च मानकांसह पार पाडता येईल.
अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय अल्पसंख्याक समुदायांच्या कल्याणासाठी आणि सर्व भारतीय हज यात्रेकरूंना जागतिक दर्जाच्या सुविधा प्रदान करण्यासाठी आपल्या अटळ वचनबद्धतेचा पुनरुच्चार करते. या परिषदेच्या निष्कर्षामुळे आगामी हज हंगामासाठी एकूण तयारी लक्षणीयरीत्या मजबूत होईल, अशी अपेक्षा आहे.
गोपाळ चिपलकट्टी/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2192459)
अभ्यागत कक्ष : 47