इफ्फीमध्ये चित्रपटांचे प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि चित्रपटांशी संबंधित उद्योगांनी केलेल्या सादरीकरणासाठी गोवा शहर सज्ज
#IFFIWood, 19 November 2025
दिनांक 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान आयोजित 56वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) 2025 आयोजित करण्यासाठी गोवा शहर सज्ज झाले आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या चित्रपट महोत्सवात इफ्फीमध्ये चित्रपटांची प्रदर्शनं, सांस्कृतिक कार्यक्रम आणि चित्रपटांशी संबंधित उद्योगांची सादरीकरणे होणार आहेत. आंध्र प्रदेश, हरियाणा आणि गोवा या राज्यांच्या चित्ररथांनी सजलेल्या भव्य उद्घाटन मिरवणुका, विविध चित्रपट स्टुडियोंनी सादर केलेली प्रदर्शनं तसेच राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या (एनएफडीसी) 50 वर्षांच्या वाटचालीच्या विशेष अभिवादनाने या भव्य सोहोळ्याला सुरुवात होईल. देशाच्या विविध भागांतून आलेले लोककलाकार देखील या मिरवणुकीत भाग घेणार आहेत.
या वर्षीच्या महोत्सवात नऊ दिवस चालणारी चित्रपटांची प्रदर्शनं, विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच चित्रपट-सृष्टीशी संबंधित विविध उद्योगांनी सादर केलेले उपक्रम असा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवासाठी गोव्यात येणारे परदेशी पाहुणे, विविध उपक्रमांतील सहभागी तसेच या महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी येणारे अभ्यागत यांना यातील कार्यक्रमांचा अत्यंत सुरळीतपणे आणि आनंददायी अनुभव येण्याची खात्री करून घेण्यासाठी गोव्यात सर्व प्रकारची तयारी जोरात सुरु आहे. शहरातील पायाभूत सुविधा तसेच लॉजिस्टिक्स संबंधी व्यवस्था चोख असतील याची काळजी घेण्यात येत आहे.
WGMF.jpeg)













इफ्फीविषयी संक्षिप्त माहिती
वर्ष 1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियात सर्वप्रथम सुरु झालेला आणि चित्रपटांशी संबंधित असा सर्वात मोठा उत्सव आहे. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा(ईएसजी) ही संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेला हा महोत्सव आता, जागतिक चित्रपटीय शक्तीकेंद्राच्या रुपात उदयाला आला असून येथे पुनर्संचयित अभिजात कलाकृती धाडसी प्रयोगांना सामोऱ्या जातात आणि दिग्गज कलाकार निर्भय नव-कलाकारांसोबत एकत्र येऊन काम करतात. इफ्फीला खऱ्या अर्थाने चमकदार रूप देणारे घटक म्हणजे त्यातील विद्युल्लतेसारख्या तळपणाऱ्या मिश्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, मास्टर क्लासेस,श्रद्धांजलीपर उपक्रम आणि कल्पना, व्यवहार आणि सहयोगी संबंधांना झेप घेऊ देणारा, चैतन्याने भारलेला वेव्हज चित्रपट बाजार. गोव्यातील चित्ताकर्षक समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेला 56 वा महोत्सव भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाजांचा झगमगता पिसारा घेऊन जागतिक मंचावर भारताच्या सर्जक प्रतिभेचा गुंगवून टाकणारा सोहळा सादर करणार आहे.
* * *
PIB IFFI CAST AND CREW | शैलेश पाटील/संजना चिटणीस/दर्शना राणे | IFFI 56
Release ID:
2191994
| Visitor Counter:
12