वस्त्रोद्योग मंत्रालय
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने वस्त्रोद्योग क्षेत्रासाठीच्या उत्पादनाशी संलग्न प्रोत्साहन योजनेअंतर्गत 17 नवीन अर्जदारांना दिली मंजुरी
मानवनिर्मित फायबर आणि तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्राला चालना
प्रविष्टि तिथि:
18 NOV 2025 6:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 18 नोव्हेंबर 2025
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने वस्त्रोद्योग क्षेत्रासाठीच्या उत्पादनाशी संलग्न प्रोत्साहन योजनेअंतर्गत निवड प्रक्रियेतील तिसऱ्या फेरीत 17 नवीन अर्जदारांना मंजुरी दिली आहे. या उल्लेखनीय पावलामुळे गुंतवणुकीला चालना मिळेल, देशांतर्गत उत्पादनात वृद्धी होईल आणि मानव निर्मित फायबर, मानव निर्मित वस्त्रप्रावरणे आणि तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्रात भारताची जागतिक स्पर्धात्मकता वृद्धिंगत करण्यास मोठी मदत होईल.
नव्याने निवड झालेल्या अर्जदारांनी एकूण 2,374 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी वचनबद्धता दर्शवली आहे. या प्रस्तावित प्रकल्पांमुळे 12,893 कोटी रुपयांची विक्री होण्याची अपेक्षा असून येत्या काही वर्षात 22,646 जणांना रोजगार मिळेल.
वस्त्रोद्योग क्षेत्रासाठीची उत्पादनाशी संलग्न प्रोत्साहन योजना 24 सप्टेंबर 2021 रोजी अधिसूचित करण्यात आली असून, मानवनिर्मित फायबर आणि कापड तसेच तांत्रिक वस्त्र उत्पादने यांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी 10,683 कोटी रुपयांच्या तरतुदीला मंजुरी देऊन ही योजना राबवण्यात आली आहे. देशातील वस्त्रोद्योगाचा विस्तार होऊन तो जागतिक स्तरावर स्पर्धात्मक व्हावा तसेच त्या माध्यमातून देशात लक्षणीय रोजगार निर्मिती व्हावी हा या योजनेचा उद्देश आहे. निवड प्रक्रियेतील पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये या योजनेअंतर्गत एकूण 74 अर्जदारांना मंजुरी देण्यात आली आहे
उद्योगांचा सहभाग अधिक असावा या विचाराने अलीकडेच मंत्रालयाने या योजनेत काही मोठ्या सुधारणा अधिसूचित केल्या आहेत. नवीन अर्ज स्वीकारण्यासाठी ऑनलाइन अर्ज पोर्टल 31 डिसेंबर 2025 पर्यंत पुन्हा उघडण्यात आले आहे.
इच्छुक कंपन्यांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी https://pli.texmin.gov.in/.वर अर्ज करावेत.
निलीमा चितळे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2191332)
आगंतुक पटल : 27