ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

44व्या आयआयटीएफ अर्थात भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात ऊर्जा मंत्रालयाच्या दालनाचे श्रीपाद नाईक यांनी केले उद्घाटन


सार्वजनिक क्षेत्रातील सात ऊर्जा उपक्रमांनी भारताच्या ऊर्जा क्षेत्रातील प्रगतीचे घडवले दर्शन

Posted On: 14 NOV 2025 1:31PM by PIB Mumbai

 

ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे 44व्या आयआयटीएफ अर्थात भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात ऊर्जा मंत्रालयाच्या दालनाचे  उद्घाटन केले. 1427 नोव्हेंबर 2025 दरम्यान हा मेळावा आयोजित केला आहे.

हे ऊर्जा दालन  भारताच्या ऊर्जा क्षेत्राच्या बदलत्या वाटचालीचे दर्शन घडवते आणि एक भारत, श्रेष्ठ भारतया भावनेचे ते प्रतिबिंब आहे, असे नाईक यांनी यावेळी सांगितले.  या दालनाद्वारे पारंपरिक ऊर्जेतून स्वच्छ ऊर्जेकडे झालेला प्रवास आणि नागरिक-केंद्रित, तंत्रज्ञानाधारित, सर्वसमावेशक व शाश्वत ऊर्जा प्रणालीच्या दिशेने झालेले परिवर्तन दाखवण्यात आल्याचे  त्यांनी सांगितले. या दालनामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील सात उपक्रम भारताच्या ऊर्जा क्रांतीतील त्यांचे सामूहिक योगदान आणि विकसित भारत @ 2047या दृष्टिकोनाचे दर्शन घडवत असल्याचे ते म्हणाले. 

युवा, विद्यार्थी आणि ऊर्जा क्षेत्रातील व्यावसायिकांना ऊर्जा दालनाला भेट देण्याचे आवाहन नाईक यांनी केले. हे दालन प्रेरणादायी आणि तंत्रज्ञानाभिमुख असून यातून भारताचे  स्वच्छ, विश्वासार्ह आणि भविष्याभिमुख ऊर्जेकडे संक्रमण समजून घेता येते  आणि भविष्यात नवकल्पकांसाठी संधी निर्माण होते, असे ते म्हणाले.

ऊर्जा  दालनाविषयी:

ऊर्जा मंत्रालयाचे दालन  (हॉल क्र. 1) भारताच्या बदलत्या ऊर्जा क्षेत्राचे दर्शन घडवते. एक भारत, श्रेष्ठ भारतया संकल्पनेवर आधारित हे दालन  पारंपरिक ऊर्जा ते स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने झालेला बदल आणि पुरवठा-केंद्रित प्रणालीतून जनताभिमुख, तंत्रज्ञानाधारित, सर्वसमावेशक व शाश्वत दृष्टिकोनाकडे झालेल्या प्रगतीचे द्योतक आहे. सात सार्वजनिक उपक्रमएनटीपीसी ( राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ ), एनएचपीसी (राष्ट्रीय जलविद्युत महामंडळ), एसजेव्हीएन (सतलज जलविद्युत महामंडळ), टीएचडीसी (टिहरी जलविद्युत विकास महामंडळ), पीएफसी (ऊर्जा वित्त महामंडळ), पॉवर ग्रिड (पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड), आरईसी (ग्रामीण विद्युतीकरण महामंडळ) यांच्या कामाची माहिती या दालनामध्ये  उपलब्ध आहे.

दालनामध्ये कायनेटिक एलईडी वॉल, अनामॉर्फिक 3डी डिस्प्ले, इमर्सिव पॉवर जर्नी झोन, स्मार्ट मीटर शोकेस, एआय अर्थात कृत्रिम प्रज्ञा-चालित होलोबॉट, क्विझ स्टेशन, स्मार्ट होम डेमॉन्स्ट्रेशन, ईईएसएल मार्ट, पीएसपी डायोरामा, थीम सेल्फी वॉल, एआय फोटो बूथ, असे अनेक आकर्षक अनुभव मिळतात.

***

सोनाली काकडे/प्रज्ञा जांभेकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2190013) Visitor Counter : 15