वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
23 आयटीईसी भागीदार देशांच्या प्रतिनिधीमंडळाचे सरकारी ई-मार्केटप्लेस (जीईएम) कडून स्वागत.
Posted On:
14 NOV 2025 9:21AM by PIB Mumbai
भारताच्या सरकार ई-मार्केटप्लेस च्या मुख्यालयाला आज आयटीईसी भागीदार देशांपैकी 23 देशांमधील 24 वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या प्रतिनिधीमंडळाने भेट दिली. ही भेट जीईएम आणि अरुण जेटली राष्ट्रीय वित्त व्यवस्थापन संस्था यांच्यातील सामंजस्य कराराअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या क्षमता वर्धन उपक्रमाचा एक भाग होती.
या भेटीमुळे डिजिटल सार्वजनिक खरेदी सुधारणा या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्याला महत्त्वपूर्ण चालना मिळाली असून, सीमेपलिकडे क्षमतावर्धन, विचार नेतृत्व आणि खरेदी उत्कृष्टता यांना प्रोत्साहन देण्याच्या जीईएम आणि अरुण जेटली राष्ट्रीय वित्त व्यवस्थापन संस्था यांच्या सामायिक दृष्टीकोनाचे प्रतिबिंब त्यातून दिसून आले.
या कार्यक्रमामुळे भारतातील डिजिटल सार्वजनिक खरेदी परिवर्तनाबद्दल जागतिक पातळीवरील समज अधिक सखोल झाली आणि पारदर्शक, कार्यक्षम व तंत्रज्ञान-आधारित सार्वजनिक खरेदीसाठी जागतिक मानदंड म्हणून जीईएम ची भूमिका अधिक दृढ झाली. प्रतिनिधींनी जीईएम च्या क्षमतावृद्धी, विचार नेतृत्व, अभ्यास समुदाय आणि वैश्विक समर्थन या मुख्य स्तंभांबाबत व्यापक चर्चा केली. हे सर्व स्तंभ विविध देशांमध्ये खरेदी पोहोच आणि कार्यप्रदर्शन मजबूत करण्यासाठी तयार केले आहेत.
कार्यक्रमादरम्यान प्रतिनिधींना जीईएमची डिजिटल संरचना, सर्वोत्तम खरेदी पद्धती, तसेच भारतात साध्य झालेल्या परिवर्तनात्मक परिणामांची सविस्तर माहिती देण्यात आली. पारंपरिक खरेदी व्यवस्थेतील प्रणालीगत अडचणींचा वेध घेत, GeM च्या तंत्रज्ञान-आधारित उपाययोजना सार्वजनिक खरेदीच्या क्षेत्रात कशी आमूलाग्र बदल घडवत आहेत, याचा अनुभवही प्रतिनिधींना देण्यात आला.
या भेटीद्वारे जीईएम ने डिजिटल सार्वजनिक खरेदी सुधारणा विषयक वैश्विक समर्थन वाढवण्याप्रति आपल्या बांधिलकीची पुन्हा पुष्टी केली. तसेच भारताचे ज्ञान, अनुभव आणि यशस्वी पद्धती भागीदार राष्ट्रांशी सामायिक करून पारदर्शक, समावेशक, तंत्रज्ञान-सक्षम आणि विस्तारक्षम खरेदी पद्धती जगभरात स्वीकारल्या जाण्यासाठी सहकार्य करण्याची तयारीही अधोरेखित केली.
***
SushamaKane/RajDalekar/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2189941)
Visitor Counter : 8