खाण मंत्रालय
केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा 2025 मध्ये खाण मंत्रालयाच्या दालनाचे उद्घाटन करणार
खाण मंत्रालय आयआयटीएफ 2025 मध्ये भारताचे खनिज सामर्थ्य प्रदर्शित करणार
Posted On:
13 NOV 2025 3:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर 2025
केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी. किशन रेड्डी 14 नोव्हेंबर 2025 रोजी नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर आयोजित भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा (IITF) 2025 मध्ये खाण मंत्रालयाच्या दालनाचे उद्घाटन करतील.
मंत्रालयाच्या दालनात भारतातील समृद्ध खनिज संसाधने, तांत्रिक प्रगती आणि विकसित भारत - एक भारत, श्रेष्ठ भारत याच्या निर्मितीमधील योगदान याचे प्रदर्शन आयोजित केले जाईल.
1,500 चौरस मीटरमध्ये पसरलेले हे दालन अभ्यागतांना संकल्पनात्मक प्रदर्शने, संवादात्मक उपक्रम आणि भारताच्या खाण आणि खनिज क्षेत्राची कामगिरी आणि दृष्टिकोनावर प्रकाश टाकणाऱ्या प्रदर्शनांद्वारे आगळा आणि माहितीपूर्ण अनुभव देईल.
या दालनात सर्व केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (सीपीएसई) आणि नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेड (नाल्को), हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (एचसीएल), जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (जीएसआय), मिनरल एक्सप्लोरेशन अँड कन्सल्टन्सी लिमिटेड (एमईसीएल), जवाहरलाल नेहरू अॅल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर (जेएनएआरडीडीसी), आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रॉक मेकॅनिक्स (एनआयआरएम), यासह मंत्रालया अंतर्गत संलग्न, अधीनस्थ आणि स्वायत्त संस्थांचा सहभाग असेल.
प्रदर्शनात खाण मंत्रालया अंतर्गत भारताच्या महत्वपूर्ण खनिज परिसंस्थेला बळकटी देण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या नॅशनल क्रिटिकल मिनरल मिशन (एनसीएमएम) वर लक्ष केंद्रित करणारा एक विशेष थीमॅटिक झोन असेल. मंत्रालयाने तयार केलेल्या या विभागात नॉन-फेरस टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट सेंटर (एनएफटीडीसी) असेल. यामध्ये भारताच्या स्वच्छ ऊर्जा आणि औद्योगिक विकासासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या आणि धोरणात्मक खनिजांचा शोध, प्रक्रिया आणि वापराला पाठबळ देणारी लक्षणीय कामगिरी आणि तांत्रिक नवोन्मेश प्रदर्शित केला जाईल.
हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड आणि हिंदुस्तान झिंक लिमिटेड (एचझेडएल) यासारख्या खासगी क्षेत्रातील भागीदार कंपन्या देखील त्यांचे नवोन्मेषी उपक्रम आणि योगदानाचे प्रदर्शन करतील.
- हिंडाल्को, भारताच्या प्रगतीला चालना देण्यात धातूंच्या भूमिकेचे महत्व सांगणारी, वंदे भारत एक्सप्रेस आणि चांद्रयान-3 ची मॉडेल्स प्रदर्शित करेल.
- एचझेडएल, शाश्वत खनिकर्म आणि तांत्रिक उत्कृष्टतेमधील आपल्या कामगिरीचे प्रदर्शन करेल.
जिल्हा खनिज फाउंडेशन (डीएमएफ) आणि स्वयं-सहायता गट (एसएचजी) यांच्या प्रदर्शनांमध्ये समुदाय विकास उपक्रम आणि खाण-क्षेत्रातील सीएसआर कार्यक्रमांच्या पाठबळाने स्थानिक पातळीवर तयार केलेल्या उत्पादनांवर प्रकाश टाकला जाईल.
व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर) आणि डिजिटल खाणकामाचा अनुभव, विद्यार्थी आणि तरुणांसाठी परस्परसंवादी प्रश्नमंजुषा आणि महत्वपूर्ण खनिजांवर, उत्खनन तंत्रज्ञानावर आणि शाश्वततेवर आधारित नवोन्मेश यावरील प्रदर्शने पाहण्यासाठी अभ्यागत उत्सुक आहेत.
हे दालन जबाबदार खाणकाम, नवोन्मेष आणि समावेशक विकासाप्रति मंत्रालयाची वचनबद्धता प्रतिबिंबित करेल, आणि खनिजांमध्ये आत्मनिर्भरता साधून, विकसित भारत @2047 च्या दिशेने सुरु असलेल्या भारताच्या प्रवासात योगदान देईल. .
* * *
शैलेश पाटील/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2189640)
Visitor Counter : 7