इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सुरक्षित, इंटरऑपरेबल आणि जबाबदार डिजिटल प्रशासन सक्षम  करून डिजीलॉकर नागरिक, मंत्रालये आणि सरकारी विभागांना जोडणारा विश्वसनीय स्तर म्हणून काम करत आहे: एस कृष्णन, सचिव एमईआयटीवाय

Posted On: 08 NOV 2025 9:29AM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली:  08 नोव्हेंबर 2025

नवी दिल्ली येथे 'डिजिलॉकर-एनेबलिंग पेपरलेस अॅक्सेस फॉर ऑल' अर्थात 'डिजिलॉकर - सर्वांसाठी विनाकागदपत्र प्रवेश'   या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे नुकतेच आयोजन करण्यात आले. या परिषदेत वरिष्ठ सरकारी अधिकारी, तंत्रज्ञान आणि वित्तीय क्षेत्रातील अग्रणी, शिक्षणतज्ज्ञ आणि डिजिटल प्रशासनातील तज्ञ एकत्र आले होते. देशात सध्या सुरू असलेल्या डिजिटल ट्रस्ट क्रांतीमधील एक महत्त्वाचा टप्पा असलेल्या कागदमुक्त प्रशासन, समावेशक शिक्षण आणि सुरक्षित डिजिटल सेवा सुलभ करण्यात असलेली डिजिलॉकरची परिवर्तनात्मक भूमिका या परिषदेत अधोरेखित करण्यात आली.

इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स डिव्हिजन (एनईजीडी) च्या वतीने भारत मंडपम येथे आयोजित केलेल्या या परिषदेच्या निमित्ताने दस्तऐवजांचे सुरक्षितपणे जतन करणारी डिजीलॉकर ही साधी सुविधा आता सरकार, शिक्षण आणि उद्योग क्षेत्रांमध्ये विश्वास, सुविधा आणि कार्यक्षमतेचा कसा आधारस्तंभ होत आहे या विषयावर चर्चा करण्यासाठी आणि ते प्रदर्शित करण्यासाठी सहकार्यात्मक व्यासपीठ उपलब्ध करून दिले गेले.

इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली ही राष्ट्रीय परिषद पार पडली. आपल्या बीजभाषणात कृष्णन म्हणाले, "डिजीलॉकर सुरक्षित, परस्परसंवादी आणि जबाबदार डिजिटल प्रशासन सक्षम करून, नागरिक, मंत्रालये आणि विभागांना जोडणारा विश्वासाचा स्तर म्हणून काम करत आहे. जिथे प्रत्येक डिजिटल संवाद विश्वासार्ह, प्रत्येक नागरिक सक्षम आणि प्रत्येक संस्था जबाबदार असेल असे भविष्य हे आमचे आमचे ध्येय आहे."

उद्घाटन सत्राचा एक भाग म्हणून, महाराष्ट्राच्या वित्त विभागाच्या प्रधान सचिव डॉ. रिचा बागला (ए अँड टी) यांनी महाराष्ट्रातील पेन्शन आणि ट्रेझरी सिस्टीमसह डिजिलॉकरच्या एकत्रीकरणावर; तसेच आसामचे प्रधान सचिव (आयटी)  के.एस. गोपीनाथ यांनी आसाममधील सेवा सेतू पोर्टलद्वारे डिजिलॉकरमध्ये 500 हून अधिक सेवांच्या एकत्रीकरणावर सादरीकरणे केली.

डिजिलॉकरच्या अवलंबात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राज्यांना 'डिजिलॉकर अ‍ॅक्सिलरेटर्स' म्हणून प्रशस्ती देण्यात आली. डिजिलॉकरच्या जलद अंमलबजावणीसाठी महाराष्ट्राला फास्ट ट्रॅक इंटिग्रेशन प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

***

सुषमा काणे/मंजिरी गानू/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2187741) Visitor Counter : 9