पंतप्रधान कार्यालय
प्राण प्रतिष्ठेनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आभार
प्रविष्टि तिथि:
21 JAN 2024 11:30PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्या अयोध्या धाम येथील श्री राम मंदिरात उद्या होणाऱ्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. पंतप्रधानांनी आशा व्यक्त केली की हा ऐतिहासिक क्षण भारताच्या विकास प्रवासाला नवीन उंचीवर घेऊन जाईल आणि त्याचबरोबर देशाचा वारसा आणि संस्कृती अधिक समृद्ध करेल.
राष्ट्रपतींनी प्राण प्रतिष्ठेच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांना एक पत्र लिहिले होते.
पंतप्रधान मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे :
"माननीय @rashtrapatibhvn जी,
अयोध्या धाम येथे राम ललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या पावनप्रसंगी दिलेल्या शुभेच्छांसाठी आपले खूप खूप आभार. मला विश्वास वाटतो की हा ऐतिहासिक क्षण भारतीय वारसा आणि संस्कृती यांना अधिक समृद्ध करेल आणि सोबतच आपल्या विकास यात्रेला एका नव्या उंचीवर घेऊन जाईल.”
***
NehaKulkarni/ShradhhaMukhedkar/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2186331)
आगंतुक पटल : 18
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam