पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांना पटना येथे आदरांजली वाहिली

प्रविष्टि तिथि: 02 NOV 2025 10:33PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाटण्यातील  दिनकर गोलांबर येथे राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांना श्रद्धांजली वाहिली.

पंतप्रधान म्हणाले की, बिहारचा गौरव असलेले राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांच्या स्फूर्तिदायी रचनांनी नेहमीच नागरिकांना भारतमातेची सेवा करण्यासाठी प्रेरित केले आहे. आज पटना येथे या महान कवीला श्रद्धांजली अर्पण करणे हा एक भाग्यदायी अनुभव आहे,असे  त्यांनी नमूद केले.

आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे:

“बिहारचा गौरव असलेले राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांच्या स्फूर्तिदायी रचनांनी नेहमीच नागरिकांना भारतमातेची सेवा करण्यासाठी प्रेरित केले आहे. आज पटना येथे या महान कवीला श्रद्धांजली अर्पण करण्याचा एक भाग्यदायी योग मला लाभला आहे “ 

***

JaydeviPujariSwami/SampadaPatgaonkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2185772) आगंतुक पटल : 27
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Odia , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Kannada , Malayalam