आदिवासी विकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशभरात जनजातीय  गौरव वर्ष पंधरवड्याला (1-15 नोव्हेंबर 2025) प्रारंभ

Posted On: 02 NOV 2025 5:28PM by PIB Mumbai

 

आदिवासी नायकांच्या शौर्य, दूरदृष्टी आणि योगदानाला  भावपूर्ण आदरांजली वाहण्याच्या हेतूने जनजातीय  गौरव  वर्ष पंधरवड्याला (1-15 नोव्हेंबर 2025) देशभरात मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.पंधरा दिवस सुरू राहणारा उत्सव भगवान बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जयंतीच्या निमित्ताने वर्षभर सुरू असणाऱ्या जनजातीय गौरव वर्षाचा एक भाग आहे. भगवान बिरसा मुंडा भारताच्या सर्वात आदरणीय स्वातंत्र्यसैनिकांपैकी एक आणि वसाहतवादी दडपशाहीविरूद्धच्या प्रतिकाराचे अजरामर प्रतीक होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या आदिवासी समुदायाच्या बलिदान, संस्कृती आणि वारशाचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या शौर्याच्या, राष्ट्र उभारणीच्या कथांची राष्ट्राला जाणीव करून देण्यासाठी जनजातीय  गौरव वर्ष साजरे करण्याची  घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली केंद्र  सरकारने दरवर्षी 15 नोव्हेंबर या दिवशी जनजातीय  गौरव दिन साजरा करण्यास प्रारंभ केला, जेणेकरून भगवान बिरसा मुंडा आणि इतरही आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांचा वारसा भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहिल.

केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री जुआल ओराम यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना जनजातीय  गौरव पंधरवडा एक लोकचळवळ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले- जेणेकरून भारतभरातील आदिवासी समुदायांची समृद्ध सांस्कृतिक ओळख, ज्ञान प्रणाली आणि यशस्वी कामगिरीचे प्रदर्शन होईल.

हिमालयापासून सागरी प्रदेशांपर्यंत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी सांस्कृतिक, शैक्षणिक आणि समुदाय केंद्रित कार्यक्रमांची मालिका  राबवली जी 15 नोव्हेंबरला साजऱ्या होणाऱ्या जनजाती गौरव दिनापूर्वी अभिमान आणि स्मरणोत्सवाची सामाईक भावना दर्शवते.

जनजातीय  गौरव वर्ष पंधरवडा आदिवासी ओळख साजरी करण्यासाठी, स्वदेशी ज्ञान प्रणाली प्रदर्शित करण्यासाठी आणि आदिवासींच्या सक्षमीकरणासाठी सरकारी उपक्रमांबाबत जागरूकता वृद्धिंगत करणारा राष्ट्रीय मंच म्हणून काम करतो.

हा सोहळा सुरू असताना, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सांस्कृतिक महोत्सव आणि प्रदर्शनापासून शैक्षणिक चर्चासत्रे आणि युवा सहभागापर्यंतच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करतील.  महोत्सवाचा समारोप 15 नोव्हेंबर 2025 रोज जनजाति गौरव दिनाच्या भव्य समारंभाने होणार आहे.

***

सुषमा काणे/विजयालक्ष्मी साळवी साने/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2185578) Visitor Counter : 26