पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नवा रायपुर येथील सत्य साई संजीवनी बाल हृदय रुग्णालयात हृदयरोगावर यशस्वी शस्त्रक्रिया झालेल्या लहान मुलांशी पंतप्रधान मोदींनी साधलेला संवाद 

Posted On: 01 NOV 2025 6:52PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान - मला हृदयाबद्दल बोलायचं आहे, कोण बोलणार?

छोटे लाभार्थी- मी हॉकीची चँपियन आहे, मी हॉकीमध्ये 5 पदके मिळवली आहेत, माझ्या शाळेत तपासणी झाली होती तेव्हा मला कळलं की माझ्या हृदयाला छिद्र आहे, त्यानंतर मी इथे आले, मग माझ्यावर शस्त्रक्रिया झाली , आता मी इथे हॉकी खेळू शकते आहे.

पंतप्रधान - बेटा, तुझी शस्त्रक्रिया कधी झाली ?

छोटे लाभार्थी- आताच एवढ्यात 6 महिन्यांपूर्वी झाली .

पंतप्रधान -  आणि तू आधी पण खेळत होतीस?

छोटे लाभार्थी-– हो.

पंतप्रधान – अजूनसुद्धा तू खेळतेस?

छोटे लाभार्थी-– हो.

पंतप्रधान – तुला पुढे  काय करायचं आहे?

छोटे लाभार्थी – मला डॉक्टर व्हायचं आहे.

पंतप्रधान – डॉक्टर होणार आहेस, डॉक्टर होऊन काय करशील?

छोटे लाभार्थी – सगळ्या लहान मुलांवर उपचार करेन.

पंतप्रधान – फक्त लहान मुलांवरच उपचार करणार?

छोटे लाभार्थी – सगळ्यांवर.

पंतप्रधान – तू डॉक्टर होशील, तेव्हा मी आणखी वयस्कर  होईन, माझ्यावरही उपचार करशील ना?

छोटे लाभार्थी – करेन ना

पंतप्रधान – नक्की?

छोटे लाभार्थी – हाे नक्की.

पंतप्रधान – ठीक आहे मग.

छोटे लाभार्थी– मला कधी असं वाटलं देखील नव्हतं की मला कधी तुम्हाला  भेटायला मिळेल, आज पहिल्यांदाच मी भेटले, मला खूप छान वाटलं.

छोटे लाभार्थी –  अलीकडेच एक वर्षांपूर्वी माझ्यावर शस्त्रक्रिया झाली आहे आणि मला मोठेपणी डॉक्टर व्हायचं आहे आणि मला सगळ्यांवर उपचार करायचे आहेत.

पंतप्रधान – अच्छा रडू कधी आलं होतं?

छोटे लाभार्थी– रडू नाही आलं.

पंतप्रधान – डॉक्टर तर सांगत होते की तू खूप रडायचीस म्हणून

छोटे लाभार्थी – डॉक्टरांनी कधी सांगितलं, नाही सांगितलं.

पंतप्रधान – नाही

छोटे लाभार्थी – मी एक भाषणाचा उतारा ऐकवू इच्छिते

पंतप्रधान – हाे हो बोल ना.

छोटे लाभार्थी – मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर, मिल जाए तुझको दरिया तो समुंदर तलाश कर, हर शीशा टूट जाता है पत्थर की चोट से, पत्थर भी टूट जाए वो शीशा तलाश कर। सजदों से तेरे क्या हुआ सदियाँ गुजर गई, सजदों से तेरे क्या हुआ सदियाँ गुजर गई, सजदा वो कर जो तेरी जिंदगी बदल दे, सजदा वो कर जो तेरी जिंदगी बदल दे।

("तुझ्या ध्येयाच्या पलीकडे जाऊन नवीन ध्येयाचा शोध घे, जर तुला सापडली नदी तर समुद्राचा शोध घे. प्रत्येक काच तुटते दगडाच्या प्रहाराने, दगडही तुटेल अशा काचेचा शोध घे. तुझ्या प्रार्थनांचे काय झाले, शतकांचा काळ सरला, अशी प्रार्थना कर जी तुझे जीवन बदलेल.")

पंतप्रधान – वाह वाह खूप छान

छोटे लाभार्थी –  2014 मध्ये माझ्यावर शस्त्रक्रिया झाली होती , तेव्हा मी 14 महिन्यांचा होतो. आता मी एकदम तंदुरुस्त  आहे, मला क्रिकेट खेळायला खूप आवडतं.

पंतप्रधान – अच्छा नियमितपणे तपासणी करून घेतोस ना, कारण शस्त्रक्रिया होऊन आता 11 वर्षं झाली आहेत ना?

छोटे लाभार्थी – हो सर.

पंतप्रधान – तर, नियमितपणे तपासणी  करून घेतोस?

छोटे लाभार्थी  – हो सर.

पंतप्रधान – आता काही त्रास नाही ना

छोटे लाभार्थी  – नाही सर,

पंतप्रधान – खेळतोस ना

छोटे लाभार्थी  – हो सर.

पंतप्रधान – क्रिकेट खेळतोस ना

छोटे लाभार्थी  – हो सर

छोटे लाभार्थी  – मला तुम्हाला भेटायचं आहे, मी येऊ शकतो का 2 मिनिट

पंतप्रधान – जवळ येऊन भेटायचं आहे, ये ना

पंतप्रधान – कसं वाटायचं जेव्हा रुग्णालयात  यावं लागायचं, तेव्हा औषधं खावी लागत असतील, इंजेक्शन दिली जात असतील, कसं वाटायचं?

छोटे लाभार्थी  – सर मला इंजेक्शनची भीतीसुद्धा वाटायची नाही. म्हणूनच माझं खूप छान प्रकारे ऑपरेशन झालं, मला अजिबात भीती वाटली नाही.

पंतप्रधान – हो का छान, मग आता तुझे शिक्षक काय म्हणतात?

छोटे लाभार्थी  – माझे शिक्षक म्हणतात, तू अभ्यासात चांगली आहेस, पण थोडी अडखळतेस.

पंतप्रधान – अच्छा असं आहे, पण तू खरं बोलते आहेस, खरं बोलण्याचा तुला खूप फायदा होईल

छोटे लाभार्थी  – मी सातवीत शिकते आहे, माझं ऑपरेशन…

पंतप्रधान – सातवीत आहेस?

नन्हें लाभार्थी – हो सर.

पंतप्रधान – मग तू नीट जेवत नसशील?

छोटे लाभार्थी  – सर , जेवते मी.

पंतप्रधान – शिक्षकांचं डोकं खात असशील (हसत हसत) हां बोल.

छोटे लाभार्थी  –  2023 मध्ये माझ्यावर शस्त्रक्रिया झाली होती आणि मला मोठं झाल्यावर शिक्षक व्हायचं आहे, शिक्षक झाल्यावर आपल्याकडे जी गरीब मुलं असतात ना , त्यांना मला मोफत शिकवायचं आहे, ज्यामुळे ती शिकून पुढे जाऊ शकतील  आणि शिक्षणामुळे आपल्या देशाचीही प्रगती होते.

पंतप्रधान – अच्छा. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का, हा आता जो महिना सुरू झाला आहे त्यामध्ये कोणाची जन्मशताब्दी आहे ते? सत्य साई बाबांची शंभरावी जयंती आहे या महिन्यात. साईबाबांनी खूप वर्षांपूर्वी जेव्हा पुट्टपार्थीच्या आजूबाजूच्या भागात पाण्याची खूपच टंचाई होती, शेतीसाठी तर पाणी नव्हतंच, पिण्याच्या पाण्याचंही खूपच दुर्भिक्ष्य होतं, तेव्हा त्यांनी त्या काळात पाणी मिळावं यासाठी खूप मोठं काम केलं आणि जवळपास 400 गावांमध्ये पिण्याचं पाणी पोहोचवलं, म्हणजेच एखाद्या सरकारला जरी एवढं  काम करायचं असेल, तर कधी-कधी खूप विचार करायला लागतो, आणि त्यांच्या कामामधून आपल्याला हा देखील संदेश मिळतो की आपण पाणी वाचवलं पाहिजे, त्याचबरोबर झाडंही लावली पाहिजेत. तुम्हाला माहितीच असेल की, मी एक अभियान राबवतो आहे- एक पेड़ मां के नाम. प्रत्येकालाच आपली आई प्रिय असते ना, तर आईच्या नावे आपण एक तरी झाड लावलं पाहिजे, आपल्या आईसाठी. त्यामुळे धरणी मातेचंही आपण ऋण फेडू शकतो त्याच बरोबर आपल्या आईच्या ऋणाचेही उतराई होऊ शकतो.

छोटे लाभार्थी  – माझं नाव अभिक आहे, मी पश्चिम बंगालचा आहे, मला मोठेपणी सैन्यात जायचं आहे आणि मला देशाची सेवा करायची आहे.

पंतप्रधान – देशाची सेवा करणार?

छोटे लाभार्थी  – हो

पंतप्रधान – नक्की?

छोटे लाभार्थी  – हो

पंतप्रधान – का बरं करणार?

छोटे लाभार्थी  – कारण देशाचे सैनिक आपलं रक्षण करतात, मला पण रक्षण करायचं आहे.

पंतप्रधान – वाह खूप छान.

छोटे लाभार्थी – मला तुमच्याशी हस्तांदोलन करायचं आहे.

छोटे लाभार्थी  – माझं स्वप्न होतं, तुम्हाला भेटण्याचं

पंतप्रधान – खरंच, कधीपासून होतं हे स्वप्न, आताचंच होतं की याच्या आधीपासूनच होतं?

छोटे लाभार्थी  – खूप दिवस झाले

पंतप्रधान – तू मला ओळखत होतीस?

छोटे लाभार्थी  –  मी तुम्हाला बातम्यांमध्ये पाहिलं होतं.

पंतप्रधान – बातम्या वाचतेस, पाहतेस.  चांगलं आहे. चला, खूप छान वाटलं तुम्हा सगळ्यांशी बोलून. आता तुम्हाला कुठलंही चांगलं काम करायचं असेल, तर आपलं शरीर हे त्याचं साधन आहे. म्हणून आपण आपलं शरीर निरोगी ठेवलं पाहिजे, थोडी योगासनं करत जा, नियमितपणा राखा. वेळेवर झोपत चला. तुम्ही आपली स्वतःची नीट काळजी घ्या. ठीक आहे? नक्की हे कराल ना?

छोटे लाभार्थी- हो सर!

पंतप्रधान –  चला माझ्या तुम्हा सर्वांना खूप-खूप  शुभेच्छा.

***

सुषमा काणे/मंजिरी गानू/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2185417) Visitor Counter : 9