पंतप्रधान कार्यालय
कन्नड राज्योत्सवानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
01 NOV 2025 9:37AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कन्नड राज्योत्सवानिमित्त कर्नाटकातील जनतेस शुभेच्छा दिल्या आहेत.
हा दिवस कर्नाटकातील लोकांच्या उत्कृष्ट आणि कष्टाळू स्वभावाच्या भावनेचा उत्सव आहे, असे मोदी म्हणाले. राज्याच्या साहित्य, कला, संगीत आणि इतर क्षेत्रांमध्ये प्रतिबिंबित होणाऱ्या अद्वितीय संस्कृतीचा गौरव करण्याचा आज दिवस आहे. कर्नाटक हे प्रज्ञेवर आधारित प्रगतीच्या भावनेचे प्रतीक आहे आणि राज्यातील सर्व लोक आनंदी व निरोगी राहावेत अशी प्रार्थना केली, असे मोदी म्हणाले.
एक्स या सामाजिक माध्यमावरील एका संदेशात पंतप्रधान म्हणाले;
आज आपण कन्नड राज्योत्सव साजरा करत आहोत, हा दिवस कर्नाटकातील लोकांच्या उत्कृष्ट आणि कष्टाळू स्वभावाच्या उत्साहाचा गौरव करणारा आहे. आपण कर्नाटकाच्या अद्वितीय संस्कृतीलाही साजरे करतो, जी तिच्या साहित्य, कला, संगीत आणि इतर क्षेत्रांत प्रतिबिंबित होते. राज्य हे प्रगतीच्या आणि प्रज्ञेच्या भावनेचे प्रतीक आहे. राज्यातील सर्व लोक आनंदी आणि निरोगी राहोत, अशी मी प्रार्थना करतो.
“ಇಂದು, ನಾವು ಕನ್ನಡ ರಾಜ್ಯೋತ್ಸವವನ್ನು ಆಚರಿಸುತ್ತಿರುವಾಗ, ಕರ್ನಾಟಕದ ಜನರಿಗೆ ಪ್ರತೀಕವಾಗಿರುವ ಶ್ರೇಷ್ಠತೆ ಮತ್ತು ಶ್ರಮಶೀಲ ಸ್ವಭಾವವನ್ನು ನಾವು ಆಚರಿಸುತ್ತೇವೆ. ಸಾಹಿತ್ಯ, ಕಲೆ, ಸಂಗೀತ ಮತ್ತಿತರ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ಪ್ರತಿಫಲಿಸುವ ಕರ್ನಾಟಕದ ಶ್ರೀಮಂತ ಸಂಸ್ಕೃತಿಯನ್ನು ಸಹ ನಾವು ಆಚರಿಸುತ್ತೇವೆ. ಈ ರಾಜ್ಯವು ಜ್ಞಾನದಲ್ಲಿ ಅಡಗಿರುವ ಪ್ರಗತಿಯ ಮನೋಭಾವವನ್ನು ಪ್ರತಿಬಿಂಬಿಸುತ್ತದೆ. ರಾಜ್ಯದ ಜನರು ಸಂತೋಷ ಮತ್ತು ಆರೋಗ್ಯದಿಂದ ಇರಲಿ ಎಂದು ನಾನು ಪ್ರಾರ್ಥಿಸುತ್ತೇನೆ.”
***
आशिष सांगळे/राज दळेकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2185123)
आगंतुक पटल : 31
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam