वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली निर्यात संवर्धन परिषदा आणि उद्योग संघटनांची बैठक
प्रविष्टि तिथि:
30 OCT 2025 10:46AM by PIB Mumbai
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी 29 ऑक्टोबर 2025 रोजी नवी दिल्लीतील वाणिज्य भवन येथे निर्यात संवर्धन परिषदा आणि उद्योग संघटनांसोबतच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविले.
या बैठकीला वाणिज्य विभाग, महसूल विभाग, उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभाग (डीपीआयआयटी), निर्यात संवर्धन परिषदा आणि विविध उद्योग संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी परराष्ट्र व्यापार महासंचालनालय आणि वाणिज्य विभागाने आर्थिक वर्ष 2025–26, च्या पहिल्या सहामाहीत केलेल्या प्रमुख सुधारणा, निर्यात सुलभ करण्यासाठी आगामी सुधारणा उपाययोजना आणि या कालावधीतील निर्यात कामगिरी यावर तपशीलवार सादरीकरणे केली.
उद्योगासमोरील मुद्दे आणि आव्हाने, निर्यात विविधीकरणात साध्य झालेले यश आणि देशातून अधिक निर्यातीला चालना देण्यासाठी भागधारकांचे विचार आणि अपेक्षा यावर ही चर्चा केंद्रित होती.
भारतीय निर्यात संघटना महासंघ, वस्त्रोद्योग,परिधान,अभियांत्रिकी,रत्ने आणि आभूषणे, वैद्यकीय उपकरणे, औषधनिर्माण,सेवा, हस्तशिल्प निर्यात संवर्धन परिषद, दूरसंचार,चर्म, भारतीय उद्योग महासंघ (सीआयआय), फिक्की, पीएचडीसीसीआय, सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स, असोचेम,नॅसकॉम यासह विविध क्षेत्रातल्या प्रतिनिधींनी भारतीय निर्यातदारांसाठी अनुकूल व्यापार वातावरणाला चालना देण्यासाठी आणि बाजारपेठेच्या संधींचा विस्तार करण्यासाठी केंद्रीय मंत्री व वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या प्रयत्नांचे यावेळी कौतुक केले.
***
NehaKulkarni/SonaliKakade/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2184070)
आगंतुक पटल : 26