दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
सरकार ने एम2एम सिम मालकी हस्तांतरणासाठी चौकटीला अंतिम रूप दिले
सेवा व्यत्ययाशिवाय एम2एम सिम मालकीचे सहज संक्रमण शक्य
Posted On:
29 OCT 2025 3:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 29 ऑक्टोबर 2025
दूरसंचार मंत्रालयाच्या दूरसंचार विभागाने एक कार्यालयीन निवेदन जारी केले आहे. त्याद्वारे एका एम2एम सेवा प्रदात्या (एम2एम एसपी)/परवानाधारकाकडून दुसऱ्या एम2एम सेवा प्रदात्या (एम2एम एसपी)/परवानाधारकाकडे एम2एम सिम मालकी हस्तांतरित करण्यासाठी चौकटीची अधिसूचना देण्यात आली आहे. सध्या, प्रचलित मार्गदर्शक तत्त्वांनुसार एम2एम सिमच्या मालकाचे नाव बदलण्याची कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे जेव्हा एम2एम एसपी बदलण्याची आवश्यकता असते तेव्हा प्रभावित अंतिम ग्राहकांसाठी एम2एम सेवा विस्कळीत होऊ शकते.
नवी चौकट एम2एम सिम मालकी हस्तांतरणासाठी एक औपचारिक प्रक्रिया स्थापित करते जेणेकरून सेवा खंडित न होता सुरळीत, अनुपालनशील संक्रमण सुनिश्चित होईल. हे सर्व एम2एम सेवा प्रदाते ( एम2एम एसपी )/परवानाधारकांना लागू आहे.
एम2एम सिम मालकी हस्तांतरणासाठी सुव्यवस्थित प्रक्रिया
या प्रक्रियेत खालील प्रमुख पायऱ्यांचा समावेश असेल:
1.एम2एम सेवा वापरकर्ता/तृतीय पक्षाकडून करण्यात येणारी हस्तांतरण विनंती : एम2एम सेवेच्या वापरकर्त्याने विद्यमान एम2एम एसपी /परवानाधारक ('हस्तांतरणकर्ता') यांना औपचारिक लेखी विनंती सादर करावी, ज्यामध्ये एम2एम सिमची तपशीलवार माहिती असेल आणि इच्छित हस्तांतरणकर्ता एम2एम एसपी /परवानाधारक निर्दिष्ट केला असेल.
2.हस्तांतरणकर्त्याकडून (विद्यमान एम2एम एसपी /परवानाधारक) ना हरकत प्रमाणपत्र (NOC): वापरकर्त्याची विनंती मिळाल्यापासून 15 दिवसांच्या आत, हस्तांतरणकर्त्याने संबंधित प्रवेश सेवा प्रदात्याला ना हरकत प्रमाणपत्र जारी करणे आवश्यक आहे. मात्र एम2एम सेवा वापरकर्त्याकडून कोणतीही थकबाकी नसावी.
3. ज्याला हस्तांतरण होणार आहे त्याच्याकडून हमीपत्र ( एम2एम एसपी /परवानाधारक) : ज्याला हस्तांतरण होणार आहे त्या एम2एम एसपी /परवानाधारकाने प्रवेश सेवा प्रदात्याला एक औपचारिक हमीपत्र/घोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे ज्यामध्ये ते हस्तांतरित केलेल्या एम2एम सिमसाठी केवायसी आणि संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासह सर्व जबाबदाऱ्या, दायित्वे आणि कर्तव्ये स्वीकारतात असे नमूद केले आहे.
4. प्रवेश सेवा प्रदात्याद्वारे पडताळणी, केवायसी आणि अपडेट: प्रवेश सेवा प्रदाता एम2एम सेवा वापरकर्त्याने केलेल्या हस्तांतरणाच्या विनंतीची पडताळणी करेल. त्यानंतर हस्तांतरकर्त्याच्या ना हरकत प्रमाणपत्राची आणि ज्याला हस्तांतरण करायचे आहे त्याच्या हमीपत्राची पडताळणी करेल. यशस्वी पडताळणीनंतर प्रवेश सेवा प्रदात्याने पुन्हा केवायसी करावे आणि नवीन मालकी दर्शवण्यासाठी ग्राहकांच्या नोंदी अद्ययावत कराव्यात.
महत्त्वाचे म्हणजे, प्रत्येक एम2एम सिम नेहमीच एम2एम एसपी /परवानाधारकाशी मॅप केलेला असणे आवश्यक आहे आणि वापरकर्त्यासाठी एम2एम सेवा कधीही खंडित केली जाऊ नये.
संपूर्ण कार्यालयीन निवेदन आणि वापरकर्ता विनंती, हस्तांतरणकर्त्याचे ना हरकत प्रमाणपत्र आणि ज्याला हस्तांतरण होणार आहे त्याच्याकडून हमीपत्र https://dot.gov.in/all-circulars?tid=3197 येथे उपलब्ध आहे.
या चौकटीची सुरुवात सेवा प्रदात्यांच्या संचालन लवचिकतेला पाठबळ देताना अंतिम वापरकर्त्यांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी दूरसंचार विभागाचे निरंतर प्रयत्न अधोरेखित करते, ज्यामुळे भारताच्या एम2एम आणि आयओटी सेवा विश्वसनीय आणि भविष्यासाठी सुसज्ज राहण्याची सुनिश्चिती होते.
शैलेश पाटील/सोनाली काकडे/प्रिती मालंडकर
Follow DoT Handles for more: -
X - https://x.com/DoT_India
Insta- https://www.instagram.com/department_of_telecom?igsh=MXUxbHFjd3llZTU0YQ==
Fb - https://www.facebook.com/DoTIndia
Youtube: https://youtube.com/@departmentoftelecom?si=DALnhYkt89U5jAaa
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2183778)
Visitor Counter : 11