पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छठ पूजेच्या पवित्र खरना विधीनिमित्त दिल्या शुभेच्छा
Posted On:
26 OCT 2025 10:52AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महापूजा छठमधील खरना या महत्त्वाच्या विधीनिमीत्त सर्व भक्तांना शुभेच्छा दिल्या आहेत. या पवित्र उत्सवातील कठोर व्रत आणि विधी करणाऱ्या सर्वांप्रती त्यांनी आदराची भावना व्यक्त केली आहे.
या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी छठी मैयाला (छठ माता) समर्पित भक्तिगीतेही सामायिक केली आहे.
यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X या समाजमाध्यमावर सामायिक केलेला संदेश :
आपणा सर्वांना महापर्व छठच्या खरना पूजेच्या खूप खूप शुभेच्छा. सर्व व्रतधारकांना आदरपूर्वक नमन! श्रद्धा आणि संयमाचे प्रतीक असलेल्या या पवित्र प्रसंगी गूळ वापरून तयार केलेली खीर तसेच सात्विक प्रसाद ग्रहण करण्याची परंपरा आहे. या विधीत छठी मैया सर्वांना आपला आशीर्वाद देवो, अशीच माझी कामना आहे.
https://www.youtube.com/watch?v=mOTEaLwwKK0
https://m.youtube.com/watch?v=fwX2g9jjo1o&pp=0gcJCR4Bo7VqN5tD”
* * *
आशिष सांगळे/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2182573)
Visitor Counter : 6