खाण मंत्रालय
खनिकर्म मंत्रालयामार्फत राष्ट्रीय अत्यावश्यक खनिज मोहिमेअंतर्गत आणखी दोन उत्कृष्टता केंद्रांना मान्यता
अत्यावश्यक खनिज मूल्य साखळीतील संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन उत्कृष्टता केंद्रांची स्थापना
Posted On:
25 OCT 2025 11:03AM by PIB Mumbai
खनिकर्म (खनिज) मंत्रालयाने राष्ट्रीय अत्यावश्यक खनिज मोहिमे (नॅशनल क्रिटिकल मिनरल मिशन – NCMM) अंतर्गत आणखी दोन संस्थांना ‘उत्कृष्टता केंद्र’ (Centres of Excellence – CoE) म्हणून मान्यता दिली आहे. या संस्थांमध्ये भारतीय विज्ञान संस्था (Indian Institute of Science – IISc) बंगळुरू आणि इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान साहित्य केंद्र (Centre for Materials for Electronics Technology – C-MET) हैदराबाद यांचा समावेश आहे. यापूर्वी मान्यता मिळालेल्या सात संस्थांव्यतिरिक्त या दोन नव्या संस्थांना मान्यता देण्यात आली आहे. ही मान्यता, प्रकल्प मंजुरी आणि सल्लागार समितीने (Project Approval and Advisory Committee – PAAC) दिलेल्या मंजुरीनंतर देण्यात आली. ही बैठक 24.10.2025 रोजी झाली होती. बैठकीला सह-अध्यक्ष म्हणून खनिज मंत्रालयाचे सचिव पियूष गोयल आणि विज्ञान-तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. अभय करंदीकर उपस्थित होते.
स्वच्छ ऊर्जा आणि गतिशीलता संक्रमण (वाहतूक क्षेत्रातील शाश्वत आणि आधुनिक बदल प्रक्रिया) या नवोदित क्षेत्रांसह प्रगत तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, संरक्षण आणि अंतराळ यांसारख्या धोरणात्मक क्षेत्रांसाठी अत्यावश्यक कच्चा माल (Critical Raw Materials) ही एक अत्यंत महत्त्वाची पुरवठा साखळी आहे. या क्षेत्रांमध्ये, आरंभ ते शेवट अशा संपूर्ण प्रक्रिया दृष्टिकोनातून (end-to-end systems approach) तंत्रज्ञान विकसित करणे, त्याचे प्रात्यक्षिक सादरीकरण करणे आणि व्यवहारात आणणे यासाठी संशोधन आणि विकास आवश्यक आहे, ज्यामुळे तंत्रज्ञान सुसज्जता स्तर (Technology Readiness Level – TRL) अधिकाधिक वाढवता येईल — म्हणजेच TRL 7 / 8 प्रायोगिक प्रकल्प आणि व्यावसायिक अंमलबजावणीपूर्व टप्पा गाठता येईल. या उद्देशाने स्थापन करण्यात आलेली उत्कृष्टता केंद्रे ही अत्यावश्यक खनिज क्षेत्रात नाविन्यपूर्ण आणि परिवर्तनशील संशोधन करतील. या माध्यमातून भारताची विज्ञान आणि तंत्रज्ञानातील क्षमता अधिक दृढ आणि प्रगत होईल, तसेच देशाच्या खनिज-आधारित स्वावलंबन आणि तांत्रिक प्रगतीच्या ध्येयाला बळ मिळेल.
प्रत्येक उत्कृष्टता केंद्र हे “हब आणि स्पोक” (Hub & Spoke), म्हणजेच मध्यवर्ती केंद्र आणि त्याच्याशी जोडलेल्या भागीदार संस्थांचे जाळे या संरचनेवर आधारित संघ (consortium) म्हणून कार्य करणार आहे. या माध्यमातून अत्यावश्यक खनिजांवरील संशोधन आणि विकास याला चालना मिळणार असून, विविध संस्थांच्या प्रमुख कौशल्यांचा एकत्रित उपयोग एका छताखाली साधला जाईल. उत्कृष्टता केंद्रांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रत्येक मुख्य संस्थांना किमान दोन औद्योगिक भागीदार आणि दोन संशोधन किंवा शैक्षणिक भागीदार या संघात सामावून घेणे आवश्यक आहे. सध्या मान्यता प्राप्त 9 उत्कृष्टता केंद्रांनी मिळून सुमारे 90 औद्योगिक, शैक्षणिक आणि संशोधन संस्था आपल्या संरचनेत सहभागी केल्या आहेत.
***
हर्षल अकुडे / आशुतोष सावे / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2182447)
Visitor Counter : 17