उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांना इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान तसेच माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील महत्त्वाच्या उपक्रमांबाबत देण्यात आली माहिती

Posted On: 24 OCT 2025 8:25PM by PIB Mumbai

 

भारताच्या डिजिटल परिवर्तनाला चालना देण्यासाठी आणि माहिती आणि दूरसंवाद परिसंस्था मजबूत करण्यासाठी मंत्रालयांनी केलेल्या प्रयत्नांची उपराष्ट्रपतींकडून प्रशंसा 

केंद्रीय रेल्वे, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितिन प्रसाद यांनी आज संसद भवनात उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली.

या भेटीदरम्यान, उपराष्ट्रपतींना देशाच्या  डिजिटल परिवर्तनाला चालना देण्यासाठी आणि देशाच्या माहिती आणि दूरसंवाद परिसंस्थेला बळकटी देण्यासाठी हाती घेतलेले इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे प्रमुख उपक्रम, कामगिरी आणि भविष्यातील पथदर्शी आराखड्याची माहिती देण्यात आली.

डिजिटलदृष्ट्या सक्षम, नवोन्मेष आधारित आणि माहिती-जागरूक समाज घडवण्यात दोन्ही मंत्रालयांनी दिलेल्या परिवर्तनकारी योगदानाबद्दल उपराष्ट्रपतींनी प्रशंसा केली. त्यांनी द्वितीय  आणि तृतीय श्रेणी  शहरांना उदयोन्मुख सॉफ्टवेअर आणि नवोन्मेष केंद्रे म्हणून विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज अधोरेखित केली. सोशल मीडियाचा जबाबदार वापर आणि डिजिटल सामग्री निर्मितीमध्ये नवोन्मेशाला प्रोत्साहन देण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.

****

निलिमा चितळे / तुषार पवार / परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2182354) Visitor Counter : 13