वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत-जर्मनी भागीदारी दृढ करण्यासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांची जर्मनीच्या अर्थ आणि ऊर्जा मंत्र्यांसोबत बैठक

Posted On: 23 OCT 2025 10:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर  2025

भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी 23 ऑक्टोबर 2025 रोजी बर्लिन येथे जर्मनीच्या अर्थ आणि ऊर्जा मंत्री कॅथरीना रायके यांच्यासोबत फलदायी चर्चा केली. ही भेट 7 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या व्हिडिओ परिषदेच्या पार्श्वभूमीवर झाली. या चर्चेदरम्यान व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, हरित ऊर्जा आणि कौशल्य विकास या क्षेत्रांतील सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला.

पीयूष गोयल यांनी जर्मनीचे आर्थिक आणि वित्तीय धोरण सल्लागार तसेच जर्मनीचे जी-7 आणि जी-20 शेर्पा डॉ. लेविन होले यांचीही भेट घेतली आणि द्विपक्षीय आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याच्या उपायांवर चर्चा केली.

यानंतर पीयूष गोयल यांनी भारताच्या दूतावासात जर्मनीतील मिटलस्टँड कंपन्यांचे सीईओ आणि उद्योग नेते यांच्या गोलमेज चर्चेचे अध्यक्षस्थान भूषवले. या उद्योग प्रतिनिधींनी भारतात व्यवसाय करण्याची आणि विद्यमान गुंतवणुकीचा विस्तार करण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली. मंत्र्यांनी भारतातील गुंतवणुकीसाठी निर्माण झालेल्या संधी आणि भारतीय सरकारने गुंतवणूक आणि व्यवसाय सुलभ करण्यासाठी केलेल्या उपायांची माहिती दिली. चर्चेदरम्यान नवोन्मेष, शाश्वतता आणि प्रगत उत्पादन क्षेत्रांतील सहकार्य आणि व्यवसाय-ते-व्यवसाय संबंध मजबूत करण्यावर भर देण्यात आला.

यानंतर दिवसाच्या उत्तरार्धात पीयूष गोयल यांची लक्झेंबर्गचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र व व्यापार मंत्री झेवियर बेटेल यांच्याशी बैठक नियोजित आहे. तसेच त्यांनी इन्फिनियॉन टेक्नॉलॉजीज, शेफलर ग्रुप, रेंक, हेरेंक्नेक्ट एजी, एनरट्रॅग एसई आणि मर्सिडीज बेंझ ग्रुप यांसारख्या अग्रगण्य जर्मन कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत (सीइओ) स्वतंत्र चर्चा करण्याचे वेळापत्रक आहे.

पीयूष गोयल यांचे कार्यक्रम 24 ऑक्टोबर रोजीही सुरू राहतील, ज्यामध्ये बर्लिन ग्लोबल डायलॉग येथील पॅनेल चर्चेत सहभाग आणि जर्मन उद्योग संघटनांसोबत आणखी बैठकांचा समावेश आहे.


शैलेश पाटील/‍गजेंद्र देवडा/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(Release ID: 2181999) Visitor Counter : 7