भारतीय निवडणूक आयोग
विशेष गहन पुनरावलोकनाच्या (SIR) तयारीसंदर्भात निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय परिषदेचा नवी दिल्लीत समारोप
Posted On:
23 OCT 2025 4:59PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर 2025
1.भारतीय निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची दोन दिवसीय परिषद आज इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रसी अँड इलेक्ट्रोरल मॅनेजमेंट, नवी दिल्ली येथे संपन्न झाली.
2.ही परिषद मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्या उपस्थितीत पार पडली.
3.देशभरातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य निवडणूक अधिकारी या परिषदेत सहभागी झाले.
4.आयोगाने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना त्यांच्या संबंधित राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील विशेष गहन पुनरावलोकनाची तयारी अंतिम करण्याचे निर्देश दिले. आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष गहन पुनरावलोकनाच्या प्रक्रियेवर सादरीकरण केले, त्यानंतर सीईओंनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले.
5.आयोगाने सीईओंना यापूर्वी दिलेल्या निर्देशांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला, विशेषतः सध्याच्या मतदारांच्या नावांचा मागील विशेष गहन पुनरावलोकना मधील मतदार यादीशी ताळमेळ घालण्याच्या प्रक्रियेवर भर देण्यात आला.
6.आयोगाने आगामी निवडणुकीसाठी सज्ज असलेल्या आसाम, तमिळनाडू, पुदुच्चेरी, केरळ आणि पश्चिम बंगाल या राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या सीईओंशी एकास एक असा थेट संवाद साधला.
7.ही परिषद 10 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या विशेष गहन पुनरावलोकनची तयारी परिषदेनंतरचा पाठपुरावा म्हणून आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी मतदारसंख्या, मागील SIR ची पात्रता तारीख आणि मतदार याद्यांची माहिती सादर केली होती.
नेहा कुलकर्णी/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2181989)
Visitor Counter : 6