पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

हरित दिवाळी अभियानाच्या माध्यमातून जागतिक वन्यजीव निधीच्या पर्यावरणीय माहिती, जागरूकता, क्षमता विकास आणि उपजीविका कार्यक्रमाद्वारे नागरिकांना, मिशन लाईफ अंतर्गत स्वच्छ, शुभ आणि हरित दिवाळी साजरी करण्याची प्रेरणा

Posted On: 20 OCT 2025 9:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर  2025

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या सहकार्याने कार्यरत असलेल्या जागतिक वन्यजीव निधी - भारत चे (WWF-India) कार्यक्रम केंद्र – संसाधने भागीदार (PC-RP) यांच्या वतीने स्वच्छ, शुभ आणि हरित दिवाळीचा सण जाणिवांचे भान राखत आणि शाश्वततेने साजरा करण्यासंबंधी जनजागृती केली गेली. या माध्यमातून त्यांनी मिशन लाईफ (Lifestyle for the Environment) या अभियानाप्रति आपली वचनबद्धताही पुन्हा एकदा अधोरेखित केली.

या अंतर्गत संस्थेच्या वतीने दिल्लीमध्ये श्वास बदलाचा - स्वच्छ हवा, निळं आकाश (Breath of Change – Clean Air, Blue Skies) या अभियानाअंतर्गत विविध 25  जागरूकता उपक्रम राबवले गेले. या उपक्रमांमध्ये 2,00,000 हून अधिक नागरिक सहभागी झाले होते. या यशस्वी अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करून संस्थेने सांस्कृतिक उत्सवांमध्ये पर्यावरणीय मूल्यांचे एकात्मिकीकरण घडवून आणण्याच्या प्रयत्नांमधले सातत्य कायम राखले आहे.  (https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2166202)

यंदाच्या दिवाळीत, जागतिक वन्यजीव निधीच्या (WWF) पर्यावरणीय माहिती, जागरूकता, क्षमता विकास आणि उपजीविका कार्यक्रमाअंतर्गत (EIACP) रोहिणी इथे स्थापित केलेल्या श्वसनक्रियेसाठी उपयुक्त कलाकृतीचे उद्घाटन केले गेले. ही कलाकृती स्वच्छ हवा आणि प्रदूषणमुक्त भविष्यासाठी सामुदायिक नेतृत्वाअंतर्गत केलेल्या कृतीचे प्रतीक ठरली आहे. (https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2176411)

मिशन लाईफ अंतर्गत नीतीमूल्यांना अनुसरून जागतिक वन्यजीव निधीच्या पर्यावरणीय माहिती, जागरूकता, क्षमता विकास आणि उपजीविका कार्यक्रमाअंतर्गत  नागरिकांना दिवाळी दरम्यान पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन केले गेले. यात खाली नमूद केलेल्या बाबींचा अंतर्भाव आहे :

  • प्लास्टिकच्या सजावटीऐवजी जैवअपघटनीय किंवा पुनर्वापर केलेल्या साहित्याचा वापर करावा
  • रांगोळी काढण्याकरता तांदळाचे पीठ, फुलांच्या पाकळ्या आणि हळद यांसारख्या नैसर्गिक घटकांचा वापर करणे
  • ऊर्जा बचतीसाठी एलईडी दिवे, सौर कंदील किंवा पारंपरिक पणत्यांचा पर्याय अवलंबणे
  • कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी स्थानिक पातळीवर निर्मित भेटवस्तू आणि उत्पादनांना प्रोत्साहन देणे
  • एकदाच वापरता येणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळणे आणि सणासुदीच्या काळात कमीत कमी कचरा निर्माण होईल हे पाहणे

हरित दिवाळी या अभियानाच्या माध्यमातून पर्यावरणाप्रति आपल्या परस्पर सामायिक जबाबदाऱ्यांबद्दल सामूहिक जाणीव निर्माण करणे हा जागतिक वन्यजीव निधीच्या पर्यावरण माहिती, जागरूकता, क्षमता निर्माण आणि उपजीविका कार्यक्रमाचा उद्देश आहे.आपण जाणिवेचे भान ठेवून उपलब्ध पर्यायांचा अवलंब केला तर, उत्सवाचा उत्साह कायम राखता येतो आणि त्यासोबतच पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्य या दोन्हींचे रक्षणही करता येते.

या उपक्रमाच्या माध्यमातून हवामानविषयक जागतिक ध्येय उद्दिष्टाच्या बाबतीत, शाश्वत विकासाच्या ध्येय उद्दिष्टांअंतर्गत जबाबदार उपभोग आणि उत्पादनाशी संबंधीत 12 वे ध्येय उद्दिष्ट तसेच, हवामान कृती विषयक 13 व्या उद्दिष्टाप्रति भारताची दृढ वचनबद्धता देखील अधोरेखित झाली आहे. जागतिक वन्यजीव निधीच्या पर्यावरण माहिती, जागरूकता, क्षमता निर्माण आणि उपजीविका कार्यक्रमाअंतर्गत सर्व नागरिकांना स्वच्छ, हरित आणि प्लास्टिकमुक्त दिवाळीची शपथ घेण्याचे आवाहन केले गेले आहे, हा सण आपल्या घरांसोबतच संपूर्ण पृथ्वीला उज्वल करो अशा शुभेच्छाही या संस्थेने दिल्या आहेत.

 

शैलेश पाटील/तुषार पवार/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(Release ID: 2181040) Visitor Counter : 5