संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

लेफ्टनंट जनरल सी. जी मुरलीधरन यांनी वैद्यकीय सेवा (लष्कर) महासंचालक म्हणून स्वीकारला कार्यभार

Posted On: 18 OCT 2025 6:46PM by PIB Mumbai

 

लेफ्टनंट जनरल सी. जी मुरलीधरन यांनी लेफ्टनंट जनरल साधना एस नायर, एव्हीएसएम, व्हीएसएम यांच्याकडून वैद्यकीय सेवा (लष्कर) महासंचालक म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. चार दशकांहून अधिक काळ राष्ट्रसेवेत उल्लेखनीय सेवा दिल्यानंतर लेफ्टनंट जनरल साधना एस नायर  30 सप्टेंबर 2025 रोजी सेवानिवृत्त झाल्या.

लेफ्टनंट जनरल मुरलीधरन हे पुण्यातील प्रतिष्ठित आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज (एएफएमसी) चे माजी विद्यार्थी असून 1987 मध्ये त्यांची आर्मी मेडिकल कॉर्प्समध्ये नियुक्ती करण्यात आली होती. ते एक प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट असून त्यांची कारकीर्द कमांड, स्टाफ आणि निर्देशात्मक नियुक्त्यांचे उत्तम संतुलन दर्शवणारी आहे. त्यांनी उत्तर आणि पश्चिम सीमेवरील विविध वैद्यकीय केंद्रांत सेवा बजावली असून, विविध परिस्थितीमध्ये कार्यात्मक आणि प्रशासकीय अनुभवाचे समृद्ध भांडार मिळवले आहे.

लष्कराच्या वैद्यकीय सेवांचे प्रमुख म्हणून, लेफ्टनंट जनरल मुरलीधरन यांचे मुख्य उद्दिष्ट सेवारत सैनिक, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना सर्वसमावेशक वैद्यकीय सेवा पुरवण्यावर लक्ष केंद्रित करणे, हे आहे. नव्याने विकसित होत असलेली सुरक्षा आव्हाने, तांत्रिक प्रगती आणि आधुनिक युद्धाचे बदलत्या स्वरूपाच्या पार्श्वभूमीवर अग्रभागी असलेल्या वैद्यकीय संस्थांची वैद्यकीय सज्जता मजबूत करणे हे देखील त्यांच्या प्रमुख प्राधान्यांपैकी एक असेल.

त्यांच्या नेतृत्वाखाली, आर्मी मेडिकल कॉर्प्स आपले - "सर्वे संतु निरामया:” हे पवित्र ब्रीदवाक्य जपत, सशस्त्र दलांच्या समुदायाला जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवा पुरवण्याच्या आपल्या वचनबद्धतेवर आढळ राहील तसेच सर्वांच्या आरोग्य आणि कल्याणासाठी सातत्याने प्रयत्नशील राहील.

***

माधुरी पांगे / श्रद्धा मुखेडकर / परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2180795) Visitor Counter : 6