वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
सरकारने घरगुती विद्युत उपकरणासाठी (पीएलआय) योजनेच्या चौथ्या फेरीसाठी अर्जाची मुदत 10 नोव्हेंबर 2025 पर्यंत वाढवली
Posted On:
17 OCT 2025 6:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर 2025
उद्योग व आंतरराष्ट्रीय व्यापार संवर्धन विभागाने घरगुती विद्युत उपकरणासाठी (एसी आणि एलईडी लाईट्स) साठी उत्पादन-आधारित प्रोत्साहन योजनेच्या चौथ्या फेरीसाठी अर्ज भरण्याची मुदत 10 नोव्हेंबर 2025 पर्यंत वाढवली आहे.
या योजनेअंतर्गत चौथ्या फेरीसाठी अर्ज भरण्याची मुदत ही 15 सप्टेंबर 2025 ते 14 ऑक्टोबर 2025 दरम्यान होती, मात्र, उद्योगातील सकारात्मक प्रतिसाद आणि वाढत्या गुंतवणूक इच्छाशक्तीच्या पार्श्वभूमीवर ही मुदतवाढ देण्यात आली आहे. पीएलआय- डब्लूजी योजनेअंतर्गत एसी आणि एलईडी लाईट्ससाठी आवश्यक प्रमुख घटकांच्या देशांतर्गत उत्पादनामुळे भारतात विश्वास आणि गती निर्माण होत आहे हे दर्शवते.
योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये आधीच लक्षणीय गुंतवणूक आकर्षित केली आहे, ज्यामुळे उत्पादन क्षमता वाढविणे आणि संपूर्ण मूल्य साखळीमध्ये रोजगारनिर्मिती सुलभ झाली आहे. एप्रिल 2021 मध्ये सुरु झालेल्या व्हाईट गुड्ससाठी पीएलआय योजनेचा एकूण खर्च 6,238 कोटी रुपये आहे. देशांतर्गत उत्पादनाला चालना देणे, घटकांचे स्थानिकीकरण करणे आणि एअर कंडिशनर आणि एलईडी लाइटिंग क्षेत्रात भारताची जागतिक स्पर्धात्मकता बळकट करणे हा या या योजनेचा उद्देश आहे.
पात्र अर्जदारांना व्हाईट गुड्स पीएलआय योजनेअंतर्गत प्रस्ताव (https://pliwg.dpiit.gov.in) या ऑनलाइन पोर्टलवर 10 नोव्हेंबर 2025 पर्यंत सादर करता येणार आहे.
शैलेश पाटील/राज दळेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2180473)
Visitor Counter : 11