ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय
ईशान्य भारताचा प्रदेश भारताच्या विकासाचे इंजिन असल्याचे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंदिया यांचे प्रतिपादन
ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयाच्या एक वर्षाच्या कामगिरीवरील संयुक्त पत्रकार परिषदेत विकासाची नवीन दिशा आणि संधीही केल्या अधोरेखित
प्रविष्टि तिथि:
17 OCT 2025 6:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर 2025
केंद्रीय दूरसंवाद आणि ईशान्य भारत क्षेत्र विकास मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंदिया यांच्या अध्यक्षतेखाली आज ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय, टपाल विभाग आणि दूरसंचार विभाग या विभागांच्या एका वर्षाच्या कामगिरीसंदर्भात (ऑगस्ट 2024 – सप्टेंबर 2025) संयुक्त पत्रकार परिषद झाली. केंद्रीय दूरसंवाद राज्यमंत्री डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी, केंद्रीय शिक्षण तसेच ईशान्य क्षेत्र विकास राज्यमंत्री डॉ. सुकांता मजुमदार आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयाचे सचिव चंछल कुमार हे देखील या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

यावेळी ज्योतिरादित्य एम. सिंदिया यांनी माध्यम प्रतिनिधींसोबत संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली, ईशान्य भारतातील प्रदेशात मागील वर्षभरात उल्लेखनीय परिवर्तन झाले असल्याचे आणि या प्रगतीबद्दल अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांच्या मार्गदर्शनात मंत्रालयाने Reform, Reach आणि Results या तीन स्तंभांवर प्रगती साधली असून पायाभूत सुविधा, गुंतवणूक, प्रशासन आणि युवा सहभागाच्या बाबतीत विक्रमी प्रगती साध्य केली असल्याचे त्यांनी नमूद केले. आज ईशान्य भारताचा प्रदेश सक्षम, परस्परांसोबत जोडलेल्या आणि भविष्यासाठी सज्ज असलेल्या नव्या भारताच्या भावनांचे प्रतिनिधित्व करत आहे असे ते म्हणाले. सीमावर्ती भाग म्हणून ओळखला जाणारा हा प्रदेश पंतप्रधानांनी मांडलेल्या दृष्टिकोनापासून प्रेरणा घेत एक आघाडीच्या स्पर्धकात परावर्तित झाला आहे, आणि आता हा प्रदेश आत्मविश्वास तसेच स्पर्धात्मकतेचे प्रतीक बनला आहे असे ते म्हणाले.

यावेळी सिंदिया यांनी ईशान्य भारताच्या प्रदेशातील उच्च प्रगतीच्या क्षमतेबद्दलही सवीस्तर मांडणी केली. मागच्या दशकभरातील या प्रदेशाची सकल राष्ट्रीय उत्पादनतली वाढ राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रदेशातील उच्च साक्षरता दर आणि मोठ्या प्रमाणातील लोकसंख्याशास्त्रीय लाभाविषयीची माहितीही त्यांनी नमूद केली. सद्यस्थितीत या प्रदेशातील 70% लोकसंख्या 28 वर्षांपेक्षा कमी वयाची असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व सकारात्मक घटकांच्या एकत्रित अस्तित्वामुळे हा प्रदेश खऱ्या अर्थाने भारताचे विकासाचे इंजिन बनला आहे, असे ते म्हणाले.

मंत्रालयाने या प्रदेशासाठी आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक, 3,447.71 कोटी रुपये इतका खर्च केला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यात 74.4% ची वाढ झाली असून, गेल्या तीन वर्षांमध्ये यात 200% पेक्षा जास्त वाढ नोंदवली गेली असल्याचे त्यांनी सांगितले. या कामगिरीतून, आर्थिक शिस्त, डिजिटल देखरेख आणि वेळेवर प्रकल्प पूर्ण करण्याला ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयाने दिलेले प्राधान्य दिसून येते, असे त्यांनी सांगितले. साप्ताहिक आढावा यंत्रणा, चार हप्त्यांमध्ये निधीचे वितरण आणि Poorvottar Vikas Setu Portal च्या माध्यमातून डिजिटल ट्रॅकिंग केले जात असल्याने पारदर्शकता आणि कार्यक्षमता आली आहे, परिणामी 97% प्रकल्प निरीक्षणाच्या व्याप्तीत आले आहेत तर 91% पूर्ण झालेले प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

शैलेश पाटील/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2180469)
आगंतुक पटल : 22