संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

‘सागरी क्षेत्रावरील सायबर हल्ल्यांचा परिणाम आणि राष्ट्रीय सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवर त्याचे उमटणारे पडसाद’ या विषयावर भारतीय नौदलाकडून चर्चासत्राचे आयोजन

Posted On: 15 OCT 2025 3:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर  2025

भारतीय नौदल 16 ऑक्टोबर 2025 रोजी नवी दिल्लीतील सुषमा स्वराज भवन येथे ‘सागरी क्षेत्रावरील सायबर हल्ल्यांचा परिणाम आणि त्याचे राष्ट्रीय सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवर उमटणारे पडसाद ’ या विषयावर एक चर्चासत्र आयोजित करत आहे. सागरी क्षेत्रातील सायबर धोक्यांबद्दल अवगत करून सायबर सुरक्षा वाढवत राष्ट्रीय सायबर सुरक्षा स्थिती मजबूत करण्याकरिता प्रमुख हितधारकांमध्ये सहकार्य वृद्धिंगत करण्याचे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.

उद्घाटनपर सत्रात प्रमुख पाहुणे, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री जितिन प्रसाद बीजभाषण करतील.

या चर्चासत्रात बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय (एमओपीएनजी), राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय (एनएससीएस), भारतीय गॅस प्राधिकरण लिमिटेड (जीएआयएल), हायड्रोकार्बन्स महासंचालनालय (डीजीएच), भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथक (सीइआरटी-इन), राष्ट्रीय महत्वपूर्ण माहिती पायाभूत सुविधा संरक्षण केंद्र (एनसीआयआयपीसी), आणि राष्ट्रीय सागरी पायाभूत सुविधा फाउंडेशन (एमएमएफ) तसेच खाजगी संस्थांचे नेते यासह मंत्रालये आणि संघटनांमधील प्रतिष्ठित तज्ज्ञांच्या नेतृत्वाखाली पॅनेल चर्चासत्रे होतील. पॅनेल चर्चेचे विषय पुढीलप्रमाणे: -

(अ) सागरी पायाभूत सुविधांना जागतिक सायबर धोके

(ब) नागरी आणि लष्करी भागीदारी

(क) महत्त्वाची माहिती पायाभूत सुविधा म्हणून सागरी क्षेत्र.

सुरक्षित, निर्धोक सायबरस्पेस मजबूत करून पंतप्रधानांच्या महासागर (प्रदेशांमध्ये सुरक्षा आणि विकासासाठी परस्पर आणि समग्र प्रगती) या दृष्टिकोनाला चालना देऊन स्वदेशी, सुरक्षित डिझाइन डिजिटल प्रणाली आणि मजबूत सार्वजनिक-खाजगी भागीदारीद्वारे 'आत्मनिर्भर भारत' चे आवाहन प्रतिध्वनीत करण्याचे या चर्चासत्राचे उद्दिष्ट आहे. मेरीटाईम इंडिया व्हिजन 2030 आणि अमृत काल व्हिजन 2047 शी सुसंगत, या चर्चासत्रात सायबरसुरक्षेला बंदर-आधारित विकास, स्मार्ट लॉजिस्टिक्स, अपतटीय ऊर्जा सुरक्षा आणि मिशन महत्वपूर्ण नौदल अभियानांचा प्रमुख सक्षमकर्ता म्हणून स्थान देण्यात आले आहे.

चर्चासत्राच्या पार्श्वभूमीवर, डेटा सिक्युरिटी कौन्सिल ऑफ इंडिया (डीएससीआय) च्या भागीदारीत एक तंत्रज्ञान प्रदर्शन आयोजित केले जाईल ज्यामध्ये देशभरातील विविध स्टार्ट-अप्सनी विकसित केलेल्या सायबरसुरक्षा आणि संरक्षण तंत्रज्ञानातील स्वदेशी नवोन्मेष सादर केले जातील. या प्रदर्शनात आत्मनिर्भरता आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने आमच्या नियोजित मार्गाला प्रोत्साहन देण्यासाठी उत्पादने प्रदर्शित केली जातील.

शैलेश पाटील/वासंती जोशी/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2179404) Visitor Counter : 13